मारहाणीचा जिल्हाभरातून झाला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 12:56 IST2020-08-28T12:56:12+5:302020-08-28T12:56:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर करण्यात ...

The beating sparked protests across the district | मारहाणीचा जिल्हाभरातून झाला निषेध

मारहाणीचा जिल्हाभरातून झाला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक विद्यार्थ्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर करण्यात आलेल्या मारहाणीचा अभाविप व भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे निषेध करण्यात आला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी, तसेच त्या त्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नंदुरबार जिल्हा संयोजक निलेश हिरे यांनी दिला. यावेळी पृथ्वीराज रावल, योगेश अहिरे, जयेश पाटील, स्वप्नील जैन, चरण जाधव, चैतन्य खैरनार, प्रेम माळी, चेतन पाडवी, ललित देसले, कल्याण गिरासे, आशिष भुरट, जयदीप शिंपी, अभिषेक तांबोळी व क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ जळगाव सिनेट सदस्य प्रा.डॉ. दिनेश खरात यांनी दिला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा जाहीर निषेध करीत आहे. मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा येत्या काळात महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही हर्षल पाटील, खुशाल जगदिश चौधरी, मयुर काशिनाथ चौधरी, युवराज जयसिंग राजपूत, जयेश सुरेश चौधरी, निलेश रमेश चौधरी, मनोज सोनवणे यांनी दिला.
शहादा
लाठीमार केल्याबद्दल आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना भारतीय जनता युवा मोर्चातर्फे अध्यक्ष शरद पाटील यांनी दिले. तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. तालुका अध्यक्ष शरद पाटील, सचिन देवरे, तुषार चित्ते, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.
तळोदा
तळोदा येथिल कार्यकर्त्यांकडून तहसीलदार पंकज लोखंडे यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. निवेदनावर भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पराग राणे, चेतन गोसावी,जितेंद्र लोहार,कैलास माळी,उदय गोसावी,हिमांशू सूर्यवंशी, हर्षल गोसावी,कुणाल माळी आदिच्या सह्या आहेत.

Web Title: The beating sparked protests across the district