सातपुडा पायथ्याशी आंब्याच्या बागा बहरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:14 PM2020-02-18T12:14:07+5:302020-02-18T12:14:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या रांझणी, गोपाळपूर, पाडळपूर, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसनसह परिसरातील आंबा बागांमध्ये यंदा ...

At the base of Satpuda mango gardens emerged | सातपुडा पायथ्याशी आंब्याच्या बागा बहरल्या

सातपुडा पायथ्याशी आंब्याच्या बागा बहरल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगतच्या रांझणी, गोपाळपूर, पाडळपूर, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसनसह परिसरातील आंबा बागांमध्ये यंदा चांगलाच बहर आला आहे. या बागांमध्ये सध्या तुडतुडे, फुल किडींचा प्रादुर्भाव झाला असून, आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून लागलीच किटक नाशकांची फवारणी करण्यात येत आहे.
या परिसरातील आंबा बागा फार प्रसिद्ध असून, यातून आंबा उत्पादक शेतकरींना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असते. परिसरातील आंब्यांना नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पूर्णपणे मोहोर येण्यास सुरूवात झाली होती. परंतु अनियमित हवामानामुये तुडतुडे, फुलकिडीचा प्रादुर्भाव झाला तर काही आंब्यांवर अल्प प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरींकडून फवारणी करण्यात येत आहे.
दरम्यान तुडतुडे हे करड्या रंगाचे पाचराच्या आकाराचे किटक पालवी, मोहोर यांचा रस शोषण करीत आहेत. तसेच आपल्या अंगातून बाहेर पडणारा चिकट द्रव सोडत असल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होत आहे. फुलकीडी ही कोवळी पाने, मोहोरवरील फुले आणि दांडे कुरतडत असल्याने मोहोर तांबुस होऊन गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तत्काळ फवारणी करण्यात येत आहे.
सातपुडा पायथ्यालगतच्या या परिसरात आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणावर असून, शेती या मुख्य व्यवसायाबरोबरच आंबा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेण्यात येत असते. या परिसरातील आंबा मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी जात असतो. त्यामुळे आंबा पिकावर झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकºयांकडून चिंता व्यक्त केली जात असून, तत्काळ फवारणी करण्यात येत आहे.

आंबा पिकावर झालेल्या तुडतुडे, फुलकिड तसेच बुरशीच्या प्रादुर्भावाची तालुका कृषी विभागाने पाहणी करून शेतकºयांना कीटक नाशकांच्या फवारणीबाबत योग्य सल्ला देण्यात येत आहे. तसेच आंबा पिकाची निगा राखण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात येत आहे.

Web Title: At the base of Satpuda mango gardens emerged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.