शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना या महामारीत शेतकरीदेखील होरपळला असून, या काळात शेतकऱ्यांची आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना या महामारीत शेतकरीदेखील होरपळला असून, या काळात शेतकऱ्यांची आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत देण्याची मागणी आहे. विशेषत: केळी उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून, हे शेतकरी संकटात साडपले आहेत.भारताची अर्थव्यवस्था शेतकरी व त्याचा येणाºया उत्पन्नावर अवलंबून आहे. एका बाजुला संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असून, सर्व कंपन्या बंद पडल्या असताना व कोणताही कामगार किंवा अधिकारी कामावर जात नसतांना शेतकरी कामावर जात होता. ज्या नित्यावश्यक बाबी व गरजेचा वस्तु होत्या त्याचा पुरवठा शेतकºयांच्या शेतीमालातुन झाला आहे.शेतकरी अश्या परिस्थितीतदेखील व्यापार व कुठल्याही अन्नपदार्थांचा भाव न वाढवता देशाचा एक सच्चा देशभक्त म्हणून उभा राहिला. शेतकºयांवर कधी अस्मानी तर अवकाळी अशी संकटे येत असतात. परंतु अशा परिस्थितीतही न डगमगता शेतकरी खंबीरपणे उभा राहतो. त्यामुळे शासनाने शेतकºयांसाठी विशेष तरतुदी करणे आवश्यक आहे.होळ मोहिदा, ता.शहादा येथील श्रीकांत अरविंद पाटील या शेतकºयाची संपूर्ण केळी लॉकडाऊनमुळे शेतातच पडूून पडून खराब झाली. श्रीकांत पाटील यांचा पारंपरिक व्यवसाय हा शेती आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नियोजन शेतीवरच असते. तालुक्यातील होळ मोहिदा शिवारात त्यांची १९ एकर शेती आहे. यंदाच्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सहा एकर क्षेत्रात केळी लावली होती.शहादा तालुक्यातील शेतकरी बागायत शेतकरी म्हणून प्रसिध्द आहेत. तालुक्यातील शेतकरी पपई, केळी, ऊस लावण्यास प्राधान्य देतात. येथील केळी दिल्ली, पंजाब, लुधियाना व विदेशातदेखील व्यापाºयाच्या माध्यमातून पाठवतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे व्यापारी वर्ग इकडे फिरकलाच नाही. त्यातच मजुर मिळणे सहज शक्य नसल्याने शेतकºयाचा माल शेतातच पडून आहे. श्रीकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार केळीचे एकरी एक हजार २४४ झाडे लावली जातात व उत्पन्न येईपर्यंत एकरी ५० हजारांच्या जवळपास खर्च येतो.यंदा लागलेल्या केळी पिकापासून एकरी उत्पन्न अंदाजे तीन ते साडे तीन लाख आले असते. पीक तयार आहे पण या केळीच्या घडाचा वजनाने झाड कोलमडून पडून राहिली. कारण केळी नेणारे व्यापारी केळी नेण्यास तयार नाही व तयार झालेला माल एकत्रीत नेवून विकणे शक्य नसल्यामुळे लागलेला खर्च निघणेदेखील शक्य नाही, अशी परिस्थिती तालुक्यातील शेतकºयांची आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी वर्गाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.माझ्या सहा एकर क्षेत्रातील केळी पूर्णपणे खराब होण्याचा मार्गावर असून, ती काढण्यासाठीदेखील मला घरून खर्च करावा लागणार आहे. झालेले उत्पन्न माझा डोळ्यादेखत केवळ लॉकडाऊनमुळे खराब होत असून, प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-श्रीकांत पाटील, शेतकरी, होळ मोहिदा, ता.शहादा