जागतिक वनदिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:19+5:302021-03-22T04:27:19+5:30

कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यादरम्यान जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन व जागतिक जलदिन याबाबत माहिती ...

Awareness activities on the occasion of World Forest Day | जागतिक वनदिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रम

जागतिक वनदिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रम

कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यादरम्यान जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन व जागतिक जलदिन याबाबत माहिती देऊन टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पनेचे पालन करून जुन्या तेलाच्या डब्या पासून तयार केलेले १०८ डबे व १०० प्लास्टिकचे पाण्याचे भांडे वाटप करण्यात आले. हे डबे जिल्हा मुख्यालय असलेले विविध शासकीय कार्यालय येथे लावण्यात येणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांना देखील याचे वाटप करण्यात येणार आहे.

प्रसंगी उपवनसंरक्षक सुरेश केवटे यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूमधून पक्ष्यांसाठी पाण्याची व अन्नाची सोयी उपलब्ध करुन द्यावी. यासाठी येणार खर्च हा अत्यंत नगण्य आहे. यामुळे नागरिकांनी पक्ष्यांच्या अन्न व पाण्याची सोय करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे सांगितले. सहायक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्यासह वनधिकाऱ्यांनी यावेळी नागरीकांसोबत संवाद साधला.

Web Title: Awareness activities on the occasion of World Forest Day