४५ वर्षावरील नागरिकांना आरोग्य विभागातर्फे निःशुल्क लस देण्यात येत आहे. त्याबाबत जनजागृती करण्यात येत असून लसीकरणाचे महत्त्व समजावून देण्यात येत आहे. आतापर्यंत तळोदा शहर व ग्रामीण भागात साडेपाच हजारापेक्षा अधिक लोकांनी लस घेतली असून एकाही व्यक्तीला लसीचे दुष्परिणाम आढळून आले नाहीत. त्यामुळे लस पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात ओळखपत्रासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना यापैकी एक सोबत नेणे आवश्यक आहे. लस घेण्यासाठी जाताना पोटभर जेवण किंवा नाश्ता करून यावे. तसेच कोविड लसबाबत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. ४५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
कोरोना लसीकरणाबाबत तळोदा तालुक्यात जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST
४५ वर्षावरील नागरिकांना आरोग्य विभागातर्फे निःशुल्क लस देण्यात येत आहे. त्याबाबत जनजागृती करण्यात येत असून लसीकरणाचे महत्त्व समजावून देण्यात ...
कोरोना लसीकरणाबाबत तळोदा तालुक्यात जनजागृती
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}