राष्ट्रवादी मेळावा व शासकीय बैठकीत उपस्थितांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:30 IST2021-02-20T05:30:45+5:302021-02-20T05:30:45+5:30

नंदुरबार : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोरोना पॅाझिटिव्ह आढळल्याने नंदुरबारच्या मेळाव्यात सहभागी पदाधिकारी तसेच शासकीय बैठकीत सहभागी ...

Attendance at NCP rallies and government meetings raised concerns | राष्ट्रवादी मेळावा व शासकीय बैठकीत उपस्थितांची चिंता वाढली

राष्ट्रवादी मेळावा व शासकीय बैठकीत उपस्थितांची चिंता वाढली

नंदुरबार : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोरोना पॅाझिटिव्ह आढळल्याने नंदुरबारच्या मेळाव्यात सहभागी पदाधिकारी तसेच शासकीय बैठकीत सहभागी अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी आपण कोरोना चाचणी करून घेणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील १० फेब्रुवारी रोजी नंदुरबारात आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. मेळाव्यात साधारणत: दीड तास त्यांची उपस्थिती होते. त्यानंतर ते अर्धा ते पाऊण तास जलसंपदा विभागाच्या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री पाटील हे गुरुवार, १८ रोजी कोरोना पॅाझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्या संपर्कातील अनेकांची चिंता वाढली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे व माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण कोरोना चाचणी करून घेणार असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनीदेखील काळजी घ्यावी, त्रास होत असेल, लक्षणे जाणवत असतील तर कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन या दोन्ही नेत्यांनी केले आहे.

Web Title: Attendance at NCP rallies and government meetings raised concerns