संचारबंदीतही दारूची आंतरराज्य वाहतुकीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 12:28 IST2020-03-28T12:28:46+5:302020-03-28T12:28:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी : देशभरात संचारबंदी असतांना, राज्याच्या सिमा सिल असतांना आणि ठिकठिकाणी नाकाबंदी असतांना अवैध दारूची वाहतूक ...

Attempts to transport liquor to interstate liquor also | संचारबंदीतही दारूची आंतरराज्य वाहतुकीचा प्रयत्न

संचारबंदीतही दारूची आंतरराज्य वाहतुकीचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणपुरी : देशभरात संचारबंदी असतांना, राज्याच्या सिमा सिल असतांना आणि ठिकठिकाणी नाकाबंदी असतांना अवैध दारूची वाहतूक करण्याचा प्रयत्न महाराष्टÑ-मध्यप्रदेश सिमेलगत उघड झाला. पोलिसांनी तीन लाखाच्या वाहनासह ५९ हजारांची दारू जप्त केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक किरण पवार यांना अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मध्य प्रदेश सिमेवरील खेडदिगर चेक पोस्टवर ड्युटीवर असलेले पोलीस नाईक विनायक सोनवणे, हवालदार काशिनाथ साळवे, गुरुदेव मोरे यांना अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती दिली. त्याच्या आधारे त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला.
मध्य प्रदेशातील खेतीया येथील अतिथी हॉटेल जवळील नाल्यालगतचे मोकळ्या जागेत व महाराष्ट्राच्या हद्दीत पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये (क्रमांक एम.एच १२ एफ. जे २४४९) दारू भरली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौघा पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास धाड टाकली असता चौघेजण पळून जात होते. त्यांचा पाठलाग केला असता चौघे मध्यप्रदेश हद्दीतील केळीच्या पिकातून पळून गेले तर एकजण ताब्यात आला. त्याने विकास लखन कोळी रा.खेतीया असे नाव सांगितले.
मुकेश चौधरी रा.शहादा यांची कार असून पोलिसांना तेथेच एक मोबाईल सापडला तो जगन मराठे रा.हनुमान चौक खेतीया याचा असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी देशी व विदेशी बनावटीची ५९ हजार रुपये किंमतीची दारू व तीन लाखाची कार असा मुद्देमाल जप्त केला. म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attempts to transport liquor to interstate liquor also