शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदार व वाहतुकदारांकडून कृत्रीम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमधील ठेकेदार आणि वाळू वाहतूकदार यांच्या संगनमतामुळे कृत्रीत वाळू टंचाई करून भाव वाढविल्यामुळे जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधील ठेकेदार आणि वाळू वाहतूकदार यांच्या संगनमतामुळे कृत्रीत वाळू टंचाई करून भाव वाढविल्यामुळे जिल्ह्यात येत्या काळात वाळू टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे गुजरातमधील वाळू ठेक्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे.   वाळूचा आगार म्हणून नंदुरबार जिल्ह्याला ओळखले जाते. तापी नदीवरील तब्बल 16 ते 18 वाळू घाट असून इतर लहान मोठय़ा नद्यांवरील वाळू घाट मिळून ही संख्या 20 पेक्षा अधीक जाते. तापीच्या वाळूला असलेली मागणी लक्षात घेता वाळूचे अर्थकारण मोठे असते. अनेकांच्या कमाईचे आणि पोट भरण्याचे साधन वाळू ठेके असतात. पर्यावरणाचे कोणतेही नियम, कायदे न पाळता अमर्याद वाळू उपसा केला जातो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून जिल्हा प्रशासनाने तापीवरील दोन ते तीन घाट लिलाव करण्याचे धोरण ठरविले आहे. त्यामुळे वाळूतून होणा:या काळ्या कमाईला मोठा ब्रेक बसला आहे. यंदा मात्र, वाळू घाट लिलाव प्रक्रिया उशीराने सुरू होत असल्यामुळे गुजरातमधील वाळू उपशावरच अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी वाळू लॉबीने कृत्रीम टंचाई निर्माण करण्याचा प्रय} करून वाळूचे भाव वाढविण्यास सुरुवात केली  आहे. जिल्ह्यात वाळूचा उपसाच नाहीदोन ते तीन वर्षापासून जिल्ह्यातील वाळू उपशावर जिल्हा प्रशासनाने अंकुश आणला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या गुजरात हद्दीतील वाळू उपशावरच जिल्ह्यातील वाळू ठेकेदार, वाहतूकदार यांना अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी गुजरात व महाराष्ट्रातील वाळू ठेकेदारांची लॉबी तयार होऊन ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. जिल्हा प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यावरणाकडे दुर्लक्षवाळू घाट ठरवितांना आणि त्यांचा लिलाव करतांना पर्यावरणाच्या नियमांना धरूनच ते करावे लागते. परंतु प्रशासन आणि वाळू ठेकेदार त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करतात. अक्षरश: नदीचे वस्त्रहरण केले जात असते. यंदा सर्वच नदी, नाले  अद्यापही प्रवाही आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वाळू यंदा नदीपात्रात उपलब्ध आहे. त्यामुळे वाळू लिलाव करतांना पर्यावरण नियम आणि कायद्यांचे तंतोतंत पालन करूनच प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे.गावांचा विरोधज्या गावाच्या क्षेत्रातील नदीपात्रात वाळू घाट ठरविला जातो व लिलाव केला जातो त्या गावांचा मात्र त्याला विरोध असतो. मर्यादेपेक्षा अधीक उपसा, भार क्षमतेपेक्षा अधीक वाळू वाहतूक करणारे वाहने यामुळे रस्त्यांची वाट लागते. संबधीत गावांच्या जमिनीतील पाणी पातळीवर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे दरवर्षी अनेक गावे ग्रामसभेत ठराव करून वाळू घाट लिलावास विरोध करतात. जिल्हा बदनामअवैध उपसा आणि काळा बाजार यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष ठेवण्यासाठी आतापासून नियोजन करणे आवश्यक आहे. दोन वर्षापूर्वी जिल्हा या बाबत बदनाम झाला होता. खोटय़ा पावत्यांच्या आधारे वाळू वाहतूक केल्या प्रकरणी थेट ठाणे जिल्ह्यातील पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.शिवाय नंदुरबार तालुक्यात मॅजीक पेनच्या सहाय्याने एकाच पावतीद्वारे अनेकवेळा वाळू उपसा करण्याचे प्रकारही उघड झाले होते. यावेळी तसे होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन काय आणि कशी उपाययोजना करेल याकडे आता लक्ष लागून आहे.

गुजरातमधील ठेकेदार हे टन नुसार वाळू विक्री करतात पाच टन वाळूचा एक ब्रास असतो. महाराष्ट्रात मात्र वाळू ग्राहक हे ब्रासनिहाय वाळू खरेदी करतात. सध्या 450 रुपये टन अर्थात 2,250 रुपये ब्रास दराने वाळू विक्री होत आहे. येत्या काळात भाव वाढविण्यासाठी आता कृत्रीम टंचाईचा प्रयत्न सुरू झाला आहे. जर जिल्ह्यातील वाळू घाट सुरू झाले तर भाव घसरतील हे तेवढेच खरे आहे. परंतु जिल्ह्यातील वाळू घाट सुरू होण्यास आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सर्व प्रकारामुळे वाळू वाहतूक करणा:यांचेही फावले आहे. अव्वाच्या सव्वा दरात आणि क्षमतेपेक्षा अधीक वाळू वाहतूक केली जात आहे.  जिल्ह्यात 50 पेक्षा अधीक वाळू वाहतूक करणारे वाहनधारक आहेत. नंदुरबार तालुका- सावळदा, बोराळे, सुजालपूर, कोपर्ली, अमळथे, नाशिंदे, ओसर्ली, आराळे.शहादा तालुका- बामखेडा तर्फे सारंगखेडा, देऊर-कमखेडा, खैरवे-भडगाव, फेस, दोंदवाडा, तोरखेडा. याशिवाय रंगावली, सरपणी, गोमाई या नद्यांवरही वाळू घाटला परवाणगी असते.