शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

धान्यमालाची आवक आली अवघी ४० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

नंदुरबार : संचारबंदीच्या कालावधीत बाजार समितीत धान्यमालाची आवक कमालीची घटली आहे. सध्या हंगाम संपत आल्याने आवक कमी व भाव ...

नंदुरबार : संचारबंदीच्या कालावधीत बाजार समितीत धान्यमालाची आवक कमालीची घटली आहे. सध्या हंगाम संपत आल्याने आवक कमी व भाव देखील स्थिर असल्याचे चित्र आहे. दरम्यान ११ वाजेची वेळमर्यादा असल्याने शेतकरी पहाटेच कृषी माल घेऊन बाजार समितीत दाखल होत असल्याचे दिसून येते.

गेल्यावर्षी लॅाकडाऊनच्या कालावधीत बाजार समितीदेखील बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे गहू, मका, कापूस, मिरची या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदा लॅाकडाऊन नसला तरी संपूर्ण संचारबंदी असतानाही कृषी मालाच्या खरेदी-विक्रीला मुभा देण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सहाही बाजार समितींमध्ये आवक निम्म्यावर आली आहे. सद्यस्थितीत केवळ गहू, मका, भुईमूग, शेंगा, ज्वारी या मालाची आवक होत आहे. ती देखील ३० ते ४० टक्क्यांवर आली असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आवक कमी असली तरी भाव स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरणही आहे.

गव्हाचे भाव यंदा स्थिर राहिले. सद्यस्थितीत केवळ १६०० ते २२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यंदा आपण २० एकरवर गहू टाकला होता. भाव चांगला मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु कोरोना आणि संचारबंदीमुळे भाव फारसा मिळू शकला नाही.

-सुदाम पाटील, शेतकरी, नंदुरबार.

खरीप हंगाम यंदा अतिपावसाने कमी आला होता. रब्बी हंगामातदेखील अवकाळी पावसाने गहू, हरभरा व मकाला फटका बसला होता. भाव यंदा बऱ्यापैकी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली. नैसर्गिकसह मानवनिर्मित संकटाचा सामना करावा लागत आहे.

-वसंत जाधव, शेतकरी, शहादा.

हंगाम संपत आल्याने बाजार समितीत आवक कमी झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व लिलाव पार पाडले जातात. संचारबंदी काळात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये यासाठी सर्व ती खबरदारी घेतली जाते.

-योगेश अमृतकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार.