शेतकऱ्याच्या गुदामामधून चोरी करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST2021-01-17T04:27:31+5:302021-01-17T04:27:31+5:30

नंदुरबार : काथर्दे, ता. शहादा शिवारातील शेतात असलेल्या गुदामातून दुचाकी व कापूस लंपास केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ...

Arrested for stealing from a farmer's warehouse | शेतकऱ्याच्या गुदामामधून चोरी करणारा अटकेत

शेतकऱ्याच्या गुदामामधून चोरी करणारा अटकेत

नंदुरबार : काथर्दे, ता. शहादा शिवारातील शेतात असलेल्या गुदामातून दुचाकी व कापूस लंपास केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल काशीनाथ कोळी, रा.काथर्दे, ता.शहादा असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

काथर्दे शिवारात रमाकांत नाना पाटील यांचे शेत आहे. तेथील गुदामामध्ये त्यांनी आपली १५ हजार रुपये किमतीची दुचाकी ठेवली होती. शिवाय कापूसही भरून ठेवला आहे. गावातीलच राहुल कोळी याने दुचाकी व ३२० रुपये किमतीचा कापूस चोरून नेला. याबाबत रमाकांत पाटील यांनी विचारणा केली असता त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यावरून पाटील यांनी फिर्याद दिल्याने कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यास अटक करण्यात आली. तपास हवालदार सुनील पाडवी करीत आहेत.

Web Title: Arrested for stealing from a farmer's warehouse