शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात हिंस्र प्राण्यांमुळे चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST

धडगाव : तालुक्यातील गाव पाड्यांवर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये चिंता वाढली ...

धडगाव : तालुक्यातील गाव पाड्यांवर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. जंगलातील झरे आटल्याने जनावरे गाव-पाड्यांच्या जवळ येत आहेत. यातून पाळीव पशुंवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगण्यात येत आहे.

उपसा सिंचन योजनेला गती द्यावी

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या उपसा सिंचन योजनेला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. यंदाच्या वर्षात ही योजना व्हावी, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने कामाला गती देण्याची सूचना करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. योजनेचे काम काहीअंशीच शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलीस गस्तीची गरज

नंदुरबार : शहरातील होळ तर्फ हवेली शिवारातील विविध वसाहतींमध्ये पोलीस गस्त वाढवण्याची रहिवाशांची मागणी आहे. या भागात भुरटे चोर रात्री भटकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चोरीच्या घटनाही वाढीस लागल्या असल्याने नागरिक चिंतेत आहेत.

बॅटऱ्या खराब

धडगाव : दुर्गम भागात दूरसंचार विभागाने लावलेल्या टाॅवरच्या बॅटऱ्या खराब झाल्या असल्याने वेळावेळी टाॅवर बंद होऊन सेवा ठप्प होत आहे. याबाबत नागरिकांनी दूरसंचार विभागाला माहिती देऊनही योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. दुर्गम भागात दररोज सेवेचा बोजवारा उडत आहे.