शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरातील पोल्ट्री व्यवसाय रुळावर येण्यास आणखी वर्षभराचा कालावधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST

नवापूर : शहराला पोल्ट्री हब म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. गुजरात-महाराष्ट्र राज्यात अंडी सप्लाय करणारे मोठे केंद्र म्हणून प्रख्यात ...

नवापूर : शहराला पोल्ट्री हब म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. गुजरात-महाराष्ट्र राज्यात अंडी सप्लाय करणारे मोठे केंद्र म्हणून प्रख्यात आहे. या ठिकाणी तब्बल १५ वर्षांनंतर बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने ३०-३५ करोड रुपयांचे नुकसान झाले. कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला साधारण कुक्कुटपालन व्यवसाय सुरू होण्यासाठी साधारणत: एक दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. नुकसानभरपाई पूर्ण मिळाले नसल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये नाराजी कायम आहे.

नवापुरातील एकूण ३० पोल्ट्री बर्ड फ्लूबाधित झाल्या होत्या. पोल्ट्रीतील आठ लाख ९८ हजार २७३ कोंबड्यांचे व दहा हजार ९१२ अन्य पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले. ५९ लाख ८३ हजार २८७ अंडी नष्ट करण्यात आली.

राज्य सरकार व केंद्र सरकारने आतापर्यंत कुक्कुट पक्ष्यांची नुकसानभरपाई म्हणून आठ कोटी दिले आहेत, तर अंडीसाठी एक कोटी ८० लाख रुपये पोल्ट्री व्यावसायिकांना अदा करण्यात आले आहे. केंद्र सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांना वाढीव नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती नवापूर पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफभाई बलेसरिया यांनी दिली आहे.

नवापूर तालुक्यातील सर्व पोल्ट्रीतून साधारण दहा लाख कोंबडीतील ७५ टक्के उत्पादन घेतले तरी दररोज नवापूर शहरातून गुजरात व महाराष्ट्र राज्यात सुमारे साडेसात लाख अंडी पाठवण्यात येत होते. मोठी आर्थिक उलाढाल होती. कोरोनाचा पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात कोविड कक्षामध्ये कोरोनाचा उपचार घेणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांनी अंडी खाण्याचा सल्ला दिल्याने मोठ्या प्रमाणात नवापूरची अंड्यांची मागणी महाराष्ट्रासह गुजरात राज्यात होती त्यावेळेस अंड्याला पाच-सहा रुपयांपर्यंत भाव आला होता.

२००६ मधील बर्ड फ्लूला २० कोटींची मदत

पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाल्याने माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या पाठपुराव्याने २० कोटी रुपयांची नुकसानभरपाई शासनाने दिली होती. मोठी कोंबडी ४० रुपये, लहान कोंबडी २० रुपयेप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात आली. फेब्रुवारी २००६ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यात ५२ पोल्ट्री फार्म बर्ड फ्लू संक्रमित झाले होते.