शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट लग्नप्रकरणी आणखी एकास अटक आरोपी संख्या नऊ, २७ पर्यंत कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

याबाबत पोलीस सूत्रानुसार, मंदाणे येथील एका युवकाशी लग्न करून अवघ्या १५ दिवसातच पळून जाऊन दुसऱ्याशी लग्न उरकून ...

याबाबत पोलीस सूत्रानुसार, मंदाणे येथील एका युवकाशी लग्न करून अवघ्या १५ दिवसातच पळून जाऊन दुसऱ्याशी लग्न उरकून करून लाखो रुपयांचा गंडा घालून तरुणी सोनू राजू शिंदे हिच्यासह त्यांच्या टोळीने फसवणूक केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या टोळीने संपूर्ण खानदेशात अनेकांची फसवणूक केल्याचे उघड होऊ लागले आहे. मंदाणे येथील भूषण सैंदाणे याने फसवणुकीची फिर्याद दिल्याने तब्बल आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पाच जण जेलची हवा खात आहेत. या टोळीतील अटकेतील आरोपींना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर अजून एक आरोपीचे नाव उघड झाले आहे. त्यास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश सोनवणे, हवालदार मिथुन शिसोदे, कृष्णा जाधव यांच्या पथकाने जामनेर तालुक्यातील शेवगाव पिंपरी शिवारातील एका शेतात दत्ता देवीदास लोणारे रा. वाशिम, हल्ली मुक्काम जामनेर यास शिताफीने अटक केली. दत्ता लोणारे या आरोपीसह अन्य अटकेत असलेल्या पाच जणांना सोमवारी २४ मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत २७ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. पैकी तरुणी पूजा उर्फ सोनू शिंदे हिची आई वंदना शिंदे यांना वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी मिळाली असून जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. उर्वरित फरार असलेले मुख्य सूत्रधार बाबाराव आमले रा. औरंगाबाद, प्रीती कांबळे, रा. हिंगोली, भैरव शिंदे यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना होणार असून त्यांना लवकरच पकडले जाईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी व्यक्त केला आहे.

सर्वच समाजाने जागृतता बाळगावी

शेतकरी, व्यावसायिक तसेच बेरोजगार तरुणांना मुली मिळत नसल्याचा गैरफायदा घेऊन लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून लाख रुपये हडप करणाऱ्या दलालांच्या टोळ्या राज्यभरात सक्रिय असल्याची सर्वदूर चर्चा आहे. ह्या टोळ्या अशा तरुणांना जाळ्यात अडकून लग्नाचे आमिष दाखवून कशी लाखो रुपयांची लूट करतात व पद्धतशीरपणे कसे फसवतात हे मंदाने व अडावद येथील घटनेने उघड झाले आहे. त्यामुळे या घटनेवरून सर्व समाजाने विवाह जोडतांना सखोल माहिती घेऊन समक्ष खात्री करून कायदेशीर मार्ग अवलंबिला पाहिजे व जागृतता ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले.