विविध वस्तू विक्रीच्या वेळा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:26 IST2020-03-26T12:26:24+5:302020-03-26T12:26:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतदेखील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, त्यासाठी ...

Announce the sale times of various goods | विविध वस्तू विक्रीच्या वेळा जाहीर

विविध वस्तू विक्रीच्या वेळा जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतदेखील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, त्यासाठी प्रशासनाने वेळा निश्चित केल्या आहेत.
केमीस्ट, मेडीकल दुकान, किरणा व भाजीपाला, पिठाची गिरणी, पेट्रोल पंप, डिझेल पंप, एलपीजी गॅस एजन्सी, इंटरनेट सुविधा पुरविणारे, पुरवठा साखळी गोडाऊन, गोदाम, वेअर हाऊस यावर कोणतेही निर्बंध नाहीत. बेकरी, रेस्टॉरंट व हॉटेल्स सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत, दूध विक्री केंद्र सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत सुरू राहतील. अंडी, चिकन, मटन व मासे विक्रेते आठवड्यातून मंगळवार, बुधवार, शुक्रवार व रविवार असे चार दिवस प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार विक्री करतील.
पशु उपचाराची औषध व दुकाने सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि कृषी विषयक खते व खाद्यतेलाची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. स्वस्त धान्य दुकाने नियमित वेळेनुसार सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कोणतेही निर्बंध नाहीत. अशा वाहनांवरील चालक व इतर कर्मचाऱ्यांनी वाहन सोडून इतरत्र फिरून गर्दी करू नये.
हातगाडीवरील फळ व भाजीपाला विक्रेते गरजेनुसार गावात फिरून फळ व भाजीपाला विक्री करू शकतील. तसेच एका वेळी एकाच व्यक्तीस माल देतील. अशावेळी नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जावी. दुकानदारांनी विशिष्ट अंतरावर चिन्हांकन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Announce the sale times of various goods