रुग्णवाहिका कमी पडू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:34+5:302021-04-02T04:31:34+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना सुरू असल्या तरी काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. फेब्रुवारी २०२१ पासून ...

Ambulances began to dwindle | रुग्णवाहिका कमी पडू लागल्या

रुग्णवाहिका कमी पडू लागल्या

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे उपाययोजना सुरू असल्या तरी काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. फेब्रुवारी २०२१ पासून रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होत असून, शहरी व ग्रामीण भागातील गल्लीगल्लीतून घराघरातून रुग्ण वाढत असल्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकाही कमी पडू लागल्या आहेत. इतकी भयानक स्थिती निर्माण झाली आहे. शहर व ग्रामीण भागात १५ रुग्णवाहिका आहेत. त्यात महावीर नागरी पतसंस्था दोन, नगरपालिका ग्रामीण रुग्णालय चार, स्व. पी. के. अण्णा फाउंडेशन एक, अभिजित पाटील यांच्या गंगोत्री फाउंडेशनची एक, समर्थ रुग्णालय एक, भगवती क्रिटिकेअर सेंटर एक, सद्दाम हुसेन फाउंडेशनची एक, मुत्तेहित मुस्लीम जमात गरीब-नवाज कॉलनी तीन व लोणखेडा येभे दोन अशा १५ रुग्णवाहिका आहेत. या सर्व रुग्णवाहिका कोरोनाचे रुग्ण दवाखान्यांमध्ये उपचारासाठी नेण्याचे काम करीत आहेत. काहीवेळा रुग्णवाहिका मिळत नसल्याने रुग्णांना खासगी वाहनांमध्ये न्यावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

Web Title: Ambulances began to dwindle