गुजरातमध्ये रुग्णवाहिकेला परवाणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:57+5:302021-03-27T04:31:57+5:30

नंदुरबार : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांमधील प्रवासी व व्यक्तींना कोरोना चाचणीशिवायपरवाणगी दिली जात नाही आहे. मात्र रुग्णांना ...

Ambulance allowed in Gujarat | गुजरातमध्ये रुग्णवाहिकेला परवाणगी

गुजरातमध्ये रुग्णवाहिकेला परवाणगी

नंदुरबार : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांमधील प्रवासी व व्यक्तींना कोरोना चाचणीशिवायपरवाणगी दिली जात नाही आहे. मात्र रुग्णांना या नियमांची अडचण आल्याने रुग्णवाहिका व त्यातील व्यक्तींसाठी तो नियम गुजरात प्रशासनाने शिथील केल्याचे शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे दिलासा मिळाला.

नंदुरबार जिल्ह्यातील अनेक रुग्ण दररोज सुरत व परिसरातील शहरांमध्ये कोरोना उपचारासाठी रवाना होत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना तिकडे धाव घ्यावी लागत आहे. परंतु राज्याच्या सिमेवर प्रत्येकाची कोरोना चाचणी करून आणि निगेटिव्ह आले तरच प्रवेश दिला जात आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अडचणी आल्या होत्या ही बाब लक्षात घेता शुक्रवारी रुग्णवाहिकेतील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना सूट दिली जात होती. परंतु खाजगी वाहने आणि त्यातील व्यक्ती व प्रवासी यांची मात्र कोरोना चाचणी केल्याशिवाय त्यांना गुजरात राज्यात प्रवेश दिला जात नव्हता.

मात्र जड वाहने आणि मालवाहतूक करणारी वाहने यांना त्यातून वगळण्यात आल्याचे चित्र होते.

Web Title: Ambulance allowed in Gujarat