श्री एकमुखी दत्त मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी अंबालाल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:59+5:302021-05-16T04:29:59+5:30

श्री दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांचे निधन झाल्याने येथील सभागृहात नुकतीच संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या ...

Ambalal Patil as the President of Shri Ekmukhi Datta Mandir Sansthan | श्री एकमुखी दत्त मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी अंबालाल पाटील

श्री एकमुखी दत्त मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी अंबालाल पाटील

श्री दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांचे निधन झाल्याने येथील सभागृहात नुकतीच संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून अंबालाल पाटील यांची निवड करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुख म्हणून रमेश पाटील, सचिव भिकन पाटील तर नवनिर्वाचित संचालकपदी मनोज तुकाराम पाटील, नगीन पाटील, ईश्वर अर्जुन पाटील, डॉ.नरोत्तम पाटील, शिरीष पाटील, अरविंद पाटील, छोटूलाल पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासकीय नियमावलीचे पालन करीत बैठक झाली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांच्या निवडीबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी कौतुक केले आहे.

संस्थानचा संचालक म्हणून केलेल्या कामाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने माझ्यावर विश्वास दाखवत माझी अध्यक्षपदी निवड केल्याने सर्वांना विश्वासात घेऊन काम करू, असे अंबालाल पाटील यांनी निवड झाल्यानंतर सांगितले.

Web Title: Ambalal Patil as the President of Shri Ekmukhi Datta Mandir Sansthan