शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात व्यसन महागले तरी मोह सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST

कोरोना काळात संचारबंदीमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक व्यक्तींच्या हाताला काम नाही. अनेक कुटुंबांवर रोजगार मिळत ...

कोरोना काळात संचारबंदीमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक व्यक्तींच्या हाताला काम नाही. अनेक कुटुंबांवर रोजगार मिळत नसल्यामुळे उपाशी राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मात्र तरुण वर्ग हाताला काम नाही म्हणून वेळ घालविण्यासाठी आणि नैराश्य दूर करण्यासाठी अनेक जण व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे. जास्त करून असे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. पोटासाठी लागणाऱ्या अन्नापेक्षा व्यसनाची वस्तू महाग झाली तरी व्यसनाचा मोह सुटत नाही. संचारबंदीमुळे शहरी भागात छोटे-मोठे व्यवसाय करणारे तसेच कंपनीमध्ये काम करणारे तरुण सध्या आपापल्या गावी परतले असून त्यांच्या हाताला काम नाही. दिवसभर घरीच बसून राहणारा तरुण ठरावीक वेळेत छुप्या मार्गाने विक्री होणारे व्यसनाचे साहित्य विकत घेण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. शासनाने तंबाखूजन्य वस्तू विक्रीवर बंदी आणली आहे. संचारबंदीमुळे दारू विक्रीवरही बंदी आणली आहे. तरी छुप्या मार्गाने या वस्तू विक्री होताना दिसत आहेत. संचारबंदीत अन्नापेक्षा व्यसन महाग झाले तरी हाताला काम नसल्याने नैराश्याच्या गर्तेत आणि तल्लफ पूर्ण करण्यासाठी उधार-उसनवारीने पैसे गोळा करून तरुण व्यसनाच्या विळख्यात गुरफटून जात असल्याचे चित्र दिसत आहे.

दिवसभरातून दोनवेळा जेवण, सकाळी न्याहरी यामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या कॅलरीज भेटत असतात. पूर्वीपासूनच शुद्ध आणि शाकाहारी जेवणाकडे भारतीयांचा कल राहिला आहे. मात्र आता हाताला काम नसल्यामुळे माणसाची दिनचर्या पार बदलून गेली आहे. खास करून ग्रामीण भागात शरीराला आवश्यक असणाऱ्या बाबीपेक्षा अपायकारक गोष्टींकडे तरुण वर्ग आकर्षिला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोनाच्या या महामारीत शासनाने लसीकरणाची मोहीम सुरू केली असली तरी चुकीच्या अफवांना बळी पडून अनेक जण लसीकरणाला प्रतिसाद देत नाहीत. मात्र ज्या वस्तूवर शरीराला अपाय होतील अशा सूचना दिलेल्या असतात अशा वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. यामध्ये दारू, तंबाखू, गुटखा, विमल, सिगरेट असतील या वस्तूंवर शरीराला हानी होणाऱ्या सूचना दिलेल्या असतात. तरी अनेक जण अपायकारक सूचनांकडे लक्ष न देता चढ्या भावाने खरेदी करून आपली तल्लफ पूर्ण करीत आहेत. मात्र दुसरीकडे शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत केले आहे. लसीकरण केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढत असून त्यामुळे कोरोनापासून बचावच होणार आहे. तरी याकडे लोक दुर्लक्ष करीत आहेत आणि दुसरीकडे १० रुपयांचा गुटखा २० रुपयाला, सिगरेट पाच रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत, दारूही दीडपट भावाने छुप्या मार्गाने खरेदी करीत असून मोहापायी तरुणवर्ग अधिकच व्यसनाच्या विळख्यात गुरफटून गेला आहे.