गडदाणीच्या कोरोना रूग्णाच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:53 AM2020-06-07T11:53:53+5:302020-06-07T11:54:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील गडदाणी येथील ४८ वर्षीय मुंबई रिटर्न कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील विसरवाडी व ...

All reports of Gaddani's corona patient contact were negative | गडदाणीच्या कोरोना रूग्णाच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटीव्ह

गडदाणीच्या कोरोना रूग्णाच्या संपर्कातील सर्व अहवाल निगेटीव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील गडदाणी येथील ४८ वर्षीय मुंबई रिटर्न कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील विसरवाडी व परिसरातील सहा व्यक्ती तसेच नवापूर येथील अन्य दोन अशा आठ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने नवापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवापूर तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने त्याच्या संपर्कातील ५८ व्यक्तींना नवापूर येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले आहे. त्या पैकी हाय रिस्क असलेल्याएकूण सहा व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. या अहवालाची प्रतीक्षा पूर्ण नवापूर तालुक्याला लागलेली होती. हे सहा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हरिश्चंद्र कोकणी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी लोकमत'शी बोलताना दिली.
त्याचप्रमाणे मालेगाव येथून नवापूरला आलेल्या एका ग्रामसेविकेचा अहवालदेखील निगेटिव्ह आला असून, घोगलपाडा येथील एका व्यक्तीचा संपर्क नंदुरबार येथील पॉझिटिव्ह रूग्णाशी आलेला होता. या व्यक्तीच्या अहवालदेखील निगेटिव्ह आलेला आहे.
नवापूर येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या मुंबई रिटर्न कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील ५८ व्यक्तींची प्रकृती चांगली आहे. विसरवाडी माचाहोंडा ही दोन गावे कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद असून, सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील सर्व सहा अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुका प्रशासनासह विसरवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी संपूर्ण गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत.
विसरवाडी व परिसरातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. विसरवाडीचे सरपंच बकाराम गावीत यांनी समाधान व्यक्त केले. एकंदरीत दोन्ही घटनेतील आठ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने नवापूर तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: All reports of Gaddani's corona patient contact were negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.