अक्कलकुव्याला शासकीय कर्मचाऱ्यामुळे कोरोनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:31 IST2021-03-17T04:31:29+5:302021-03-17T04:31:29+5:30

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी तालुक्यातील तसेच अक्कलकुवा शहरातील नागरिकांनी प्रशासनाने ...

Akkalkuwa is threatened by a government employee | अक्कलकुव्याला शासकीय कर्मचाऱ्यामुळे कोरोनाचा धोका

अक्कलकुव्याला शासकीय कर्मचाऱ्यामुळे कोरोनाचा धोका

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी तालुक्यातील तसेच अक्कलकुवा शहरातील नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे वेळोवेळी काटेकोरपणे पालन केले आहे तसेच तालुक्यामध्ये कोरूना चा प्रसार होऊ नये म्हणून नागरिक सतर्कतेने वावरत असल्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात ठेवली आहे मात्र अक्कलकुवा शहरासह तालुक्यामध्ये दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या विविध विभागातील शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे तसेच शिक्षकांमुळे शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे अक्कलकुवा शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तसेच शिक्षकांना तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याचे बंधनकारक करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन उपाययोजना राबवित असून शहादा व नंदुरबार तालुक्यातील अधिकारी कर्मचारी दररोज ये-जा करीत असल्यामुळे शहरात कोरोना संसर्ग होण्याची भिती नाकारता येणार नाही. याबाबत प्रशासनाने याबाबत दखल घेऊन उपाययोजना करण्याची आवशक्यता आहे.

कर्मचाऱ्याची मनमानी

अक्कलकुवा येथे कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करीत असल्यामुळे शहरासह तालुक्यातील विविध विकास कामांसाठी त्यांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नसल्याने कर्मचारी मनमानी करत आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयाच्या वारवांर चकरा माराव्या लागत असून कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी थांबणे आवश्यक करावे.

Web Title: Akkalkuwa is threatened by a government employee