शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा ग्रा.प.गैरव्यवहार आज अहवाल शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील बहुचर्चित अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील ४ कोटी ७५ लाख रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणाची चाैकशी विस्तार अधिका-यांच्या त्रिस्तरीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील बहुचर्चित अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील ४ कोटी ७५ लाख रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणाची चाैकशी विस्तार अधिका-यांच्या त्रिस्तरीय समितीने शनिवारी रात्री उशिरा पूर्ण केली. त्यांनी केलेल्या चाैकशीचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात आला असून मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अहवालाची तपासणी करुन अंतिम निर्णय देणार आहेत.    यामुळे दोघा अधिका-यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायतीत २०१६ ते २०२० या काळात पाच टक्के पेसा निधी व चाैदाव्या वित्त आयोगातील निधीचा बेहिशोबी व मनमानी पद्धतीने खर्च करुन विकास कामे केल्याचे दर्शवण्यात आले होते. यातून ग्रामपंचायतीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वाढल्याने २०२० मध्ये चाैकशी समिती नियुक्त करुन ग्रामपंचायतीचे दप्तर व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. यातून ९ जणांच्या कार्यकाळात गैरव्यवहार दिसून येत असल्याने त्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. नोटीसा देण्यात आलेल्यांमध्ये दोन माजी सरपंच, एक उपसरपंच, दोन प्रशासक, दोन ग्रामविकास अधिकारी, एक ग्रामसेवक आणि विद्यमान सरपंच अशा ९ जणांचा समावेश होता. या सर्वांनी नोटीसा मिळाल्यानंतर समितीला दिलेले खुलासे हे परिपूर्ण नसल्याने त्यांना पुन्हा नोटीसा देत १० फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत पाचारण करण्यात आले होते. याठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून चाैकशी सुरु होती. शनिवारी रात्री उशिरापर्यंत २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यातून तीन दिवसाच्या चाैकशीचा अहवाल तयार करुन तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अहवालाचे अवलोकन करुन पुढील निर्णय घेणार आहेत.