अक्कलकुवा आणि शहाद्यातील दोघांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:00 IST2020-04-28T12:59:59+5:302020-04-28T13:00:12+5:30

अहवाल : अक्कलकुव्यातील आरोग्य विभागाच्या चालकाला लागण

Akkalkuwa and Corona to both of the martyrs | अक्कलकुवा आणि शहाद्यातील दोघांना कोरोना

अक्कलकुवा आणि शहाद्यातील दोघांना कोरोना

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलेल्या १२७ पैकी ५० जणांचे नमुने जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले असून यात दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ यातील एक रुग्ण शहादा तर दुसरा अक्कलकुवा येथील आहे़
मंगळवारी सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहादा येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेली १५ वर्षीय मुलगी तर अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ५८ वर्षीय चालक अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे़ यातील १५ वर्षीय मुलीला यापूर्वीच जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे़ तर आरोग्य विभागाच्या अँब्युलन्स चालकालाही मंगळवारी अक्कलकुवा येथून नंदुरबार येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे़ या दोघांना कोरोनाची लागण झाल्याने आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १३ झाली आहे़ शहाद्यात पाच, अक्कलकुवा ४ तसेच नंदुरबारात चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे़ शहाद्यातील प्रभाग चारमधील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे़ जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असून त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे़
दरम्यान अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अँब्युलन्स चालकाने कोरोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात आणले होते़ यातून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़

 

Web Title: Akkalkuwa and Corona to both of the martyrs