शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणीअभावी शेती सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधीत झालेल्या तालुक्यातील विस्थापीत १५० विस्थापित शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधीत झालेल्या तालुक्यातील विस्थापीत १५० विस्थापित शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीकडे गेल्या दीड-दोन वर्षापासून डिमांडची मागणी केली आहे. मात्र अजूनही त्यांना डिमांड उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे त्यांना वीज जोडणीअभावी सिंचनाच्या सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन तातडीने डिमांड मिळवून द्यावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.महाकाय सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील कुटुंबांचे तळोदा व शहादा तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना सिंचनाच्या सुविधेसह नियमानुसार जमिनीही दिल्या आहेत. तथापि, अजूनही तळोदा तालुक्यातील तºहावद, रेवानगर, रोझवा, गोपाळपूर पुनर्वसन वसाहतीतील शेतकºयांना कृषीपंपासाठी लागणारी महावितरणची वीज जोडणी उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे या शेतकºयांना आजही कोरडवाहूच शेती करावी लागत असल्याचे हे शेतकरी सांगतात. वास्तविक यातील बहुसंख्य शेतकºयांनी महावितरणकडे डिमांड नोटसाठी लागणारे कागदपत्रे व रक्कमही भरली आहे. ही रक्कम भरुन साधारण दीड ते दोन वर्षे लोटली आहेत. असे असताना त्यांना आजतागायत संबंधित यंत्रणेने वीज जोडणी दिलेली नाही. त्यासाठी ते सातत्याने वीज वितरण कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. यात शेतकºयांचा वेळ व पैसाही वाया जात आहे. तरीही पदरी निराशाच पडत असल्याची व्यथा विस्थापितांनी बोलून दाखवली आहे. या शेतकºयांच्या सिंचन व्यवस्थेसाठी लागणारा निधी जिल्हा विकास यंत्रणा अर्थात डीपीडीसीने निधीही मंजूर केला आहे. त्याचबरोबर टेंडरची प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारास कामाचा ठेकाही देण्यात आला आहे. परंतु महावितरणच्या वरिष्ठ प्रशासनाची काम सुरू करण्यास लागणारी परवानगी मिळत नसल्याने काम रखडल्याचे म्हटले जात आहे. वीज जोडणीअभावी तºहावद पुनर्वसन वसाहतीतील काही शेतकºयांचे बोअर केलेले निरुपयोगी ठरत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. या शेतकºयांना शासनाकडून सोलर पंपाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी रोझवा पुनर्वसन परिसरातील शेतकºयांचे बोअर साधारण ३०० ते ३५० फूट खोल आहेत. त्यामुळे एवढ्या खोलवरुन पाणी उपसा सोलरपंप करू शकणार नाही. या शेतकºयांनी सोलर पंपास विरोध केला असून महावितरणचेच कनेक्शन देण्याची मागणी केली आहे.४शेतकºयांनी शहादा उपविभागातील अधिकाºयांबरोबरच तळोदा येथील अधिकाºयांना वीज कनेक्शन देण्यासाठी साकडे घातले आहे. तथापि, त्यांनी नेहमीप्रमाणे वायदाच दिल्याचे बाधीत शेतकºयांनी सांगितले. वास्तविक सिंचन सुविधेसह जमीन देण्याचा कायद्याने प्रकल्पग्रस्त शेतकºयांना अधिकार आहे. प्रशासनाचीही जबाबदारी आहे. मात्र त्यांनीच दुर्लक्ष केल्याचा आरोप बाधीतांनी केला आहे. त्यामुळे महावितरणमधील अधिकाºयांचे फावले आहे. डिमांड नोटबाबत जिल्हा प्रशासनाने संबंधितांना सक्त ताकीद द्यावी अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.