शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

शेती सुधारणा कायदा शेतकरी हिताचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 13:10 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. कॅांग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या सरकारने ते ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शेती सुधारणा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. कॅांग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या सरकारने ते केले. असे असतांना आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधासाठी विरोध म्हणून विरोधकांनी शेतकरी हिताचा निर्णयाआड येऊ नये असे प्रतिपादन खासदार डॅा.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत केले.यासंदर्भात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॅा.गावीत यांनी सांगितले, शेतकरी सुधारणा कायदा हा ऐतिहासीक आहेत. त्याचे सकारात्मक दूरगामी परिणाम होणार आहेत. कॅांग्रेस, राष्ट्रवादीनेही त्यांच्या सरकारच्या काळात या सुधारणा आणल्या होत्या. कॅांग्रेसच्या २०१९ च्या घोषणापत्रात या सुधारणांचा उल्लेख आहे. खासदार शरद पवार यांनी २०१०-११ मध्ये सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एपीएमसी कायद्यात सुधारणांवर भर देणारे पत्र पाठविले होते. इतर विरोधी पक्षांनी देखील या कायद्याचे समर्थनच केले होते. परंतु आता पंतप्रधान मोदी यांना विरोधाला विरोध म्हणून सर्व विरोधी पक्ष विरोध करीत आहेत. या कायद्याचे सकारात्मक आणि चांगले उदाहरण आपल्याच भागात अर्थात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातच पुढे आले आहे. भटाणे, ता.शिरपूर येथील शेतकरी जितेंद्र भोई यांना न्याय मिळाला आहे. पंतप्रधानांनी मन की बात मध्ये त्याचा उल्लेख देखील केला आहे. खासदार शरद पवार यांच्या आत्मचरित्रात देखील या प्रश्नाचा सविस्तर उहापोह करण्यात आलेला आहे.  शेतकरी कायद्यामुळे अनेक बाबींना आळा बसणार आहे. त्याबाबत शेतकरी देखील आग्रही आहेत. असे असतांना त्यांची दिशाभूल विरोधकांकडून केली जात असल्याचेही खासदार डॅा.हिना गावीत यांनी यावेळी स्पष्ट केले.