कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास महाराष्ट्र राज्यात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:30+5:302021-05-16T04:29:30+5:30

गुरुवारी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी निगेटिव्ह असल्यास राज्यात प्रवेश दिला जाईल, असे आदेश केल्याने ...

Admission to Maharashtra if Corona report is negative | कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास महाराष्ट्र राज्यात प्रवेश

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास महाराष्ट्र राज्यात प्रवेश

गुरुवारी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना तपासणी निगेटिव्ह असल्यास राज्यात प्रवेश दिला जाईल, असे आदेश केल्याने पोलीस प्रशासनाने नवापूर सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच गुजरात राज्यातील उच्छल पोलिसांनीदेखील महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात तपासणी सुरू केली आहे. ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास अशा लोकांना गुजरात राज्यातदेखील प्रवेश दिला जात आहे. कोरोना रिपोर्ट नसल्यास वाहनचालकांना महाराष्ट्रात परतवून लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागामध्ये महाराष्ट्र गुजरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही राज्यांतील वाहनचालकांची कसून तपासणी केली जात आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये नवापूर पोलीस करीत आहे. नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा सीमावर्ती भागात नवापूर पोलिसांनी २४ तासांसाठी याठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

Web Title: Admission to Maharashtra if Corona report is negative