शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासनाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी तळोदा तालुक्यातील राजविहीर येथे कोरोना लसीची पहिला मात्रा घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले. ...

उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी तळोदा तालुक्यातील राजविहीर येथे कोरोना लसीची पहिला मात्रा घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले. राजविहीर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने मोरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लस घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वाहनचालक सुनील पाटील यांनीदेखील त्याचठिकाणी नोंदणी करून लस घेतली. कोरोना लस पूर्णपणे सुरक्षित असून कोरोनामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता १८ वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी मोरे यांनी केले. त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाची माहितीदेखील घेतली. गावातील लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत पवार, सरपंच लहू पाडवी, पंचायत समितीचे माजी सभापती आकाश वळवी, जिल्हा परिषद माजी सदस्य सतीश वळवी, आरोग्य सेविका चंद्रकला केंद्रे व जिरमा गावीत आदी उपस्थित होते.

बिजादेवी येथे वृद्धांचे लसीकरण

नवापूर तालुक्यातील बिजादेवी येथे ८० वर्षांचे वृद्ध वंतीबाई वळवी आणि जंगल्या वळवी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. लसीकरण केंद्रावर जाऊन त्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली. त्यांचे उदाहरण इतरांसाठी प्रेरक असून नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.

तलवाडे येथे लसीकरण शिबिराला प्रतिसाद

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. आर. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बुद्रुक येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत १४७ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. लसीकरणासाठी जिल्हा परिशछ शाळेच्या शिक्षकांनी पूर्वीच नागरिकांची नोंदणी केली होती. शिबिरासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज गावीत, डॉ. चित्रांगिनी खैरनार, आरोग्य सेवक महेंद्र घुगे, अंकिता परदेशी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे काम पाहिले.

नवापूर तालुक्यातील लसीकरण कार्यक्रमाला गती द्या - जिल्हाधिकारी

नवापूर तालुक्यातील लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यात यावी. फिरत्या पथकामार्फत गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले. नवापूर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, तहसीलदार मंदार कुलकर्णी, मुख्याधिकारी महेश चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश मावची आदी उपस्थित होते. डॉ. भारुड म्हणाले, जनतेतील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. शिक्षकांनी गावात जाऊन पात्र व्यक्तींची नोंदणी करावी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे. गावात कोरोनाबाधित आढळल्यास त्यास त्वरित संस्थात्मक अलगीकरणात दाखल करावे, असे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय विसरवाडी आणि खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. त्यांनी नवापूर ट्रामा केअर सेंटर इमारत आणि उर्दू हायस्कूल येथील लसीकरण केंद्रालाही भेट दिली.