शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील २३ जणांना प्रशासनाने केले क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरात सात जणांना कोरोना संसर्ग झाला आहे़ गुरुवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरात सात जणांना कोरोना संसर्ग झाला आहे़ गुरुवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना आमलाड येथील क्वारंटाईन कक्षात हलवण्यात आले आहे़ यातील १३ जण थेट संपर्कातील असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात स्वॅब देण्यासाठी पाठवण्यात आले होते़ ््त्यांच्या अहवालाकडे लक्ष लागून राहणार आहे़दरम्यान पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने त्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहिम हाती घेतली आहे़ याशिवाय पालिकेने निर्जंतुकीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे़ तळोद्यातील ठाणे येथून परतलेल्या वृद्धेचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता़ वृद्धेस कोरोनासदृश लक्षणे होती़ दरम्यान तिच्या मुलास आरोग्य विभागाने क्वारंटाईन करुन त्याचा स्वॅब घेतला होता़ त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले कुटूंबिय आणि नातेवाईक अशा १३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते़ यातील सात जणांचे रिपोर्ट हे गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते़ यामुळे महसूल, आरोग्य आणि पालिका प्रशासन सतर्क झाले होते़ गुरुवारी रात्री उशिरा यात सातही जणांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घेण्यात येत होते़ यात २३ जण आढळून आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले़ उशिरापर्यंत सुरु असलेल्या या शोधाशोधीसाठी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ शुक्र्रवारी जिल्हा रुग्णालयात स्वॅब देऊन परतलेल्यांनंतर आणखी पाच जणांना जिल्हा रुग्णालयात स्वॅब देण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान आरोग्य विभागाने या सर्वांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना केल्या आहेत़प्रशासनाकडून मोठा माळीवाडा याआधीच सील करण्यात आला होता़ गुरुवारी रात्री शिवरामनगर सील करण्यात आले तर तळोेदा शहर पाच दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे़ याचबरोबर या भागात आरोग्य, पोलीस आणि महसूली यंत्रणेचे पथक तैनात करण्यात आले आहे़ तळोदा पालिकेने शिवरामनगर व मोठा माळीवाडा परिसराच्या निर्जंतुकीकरण व साफसफाईची मोहिम सुरु केली आहे़ याठिकाणी नियमितपणे फवारणी होत असून कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत़ प्रांताधिकारी अविशांत पांडा यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार पंकज लोखंडे, मुख्याधिकारी सपना वसावा, तालुका मुख्याधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत़

तालुका आरोग्य विभागाने शहरात दोन झोन तयार केले आहेत़ यासाठी चार पथक नियुक्त केले आहेत़ १ पथक शिवराम नगर तर दोन पथक हे काकाशेठ गल्ली आणि मोठा माळीवाडा भागात सर्वेक्षण करत आहे़ १४ दिवस ही पथके या भागात फिरुन वेळोवेळी माहिती घेणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी सांगितले आहे़ पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सातपैकी एक महिला ह्या शहरातील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत़ गेल्या आठवड्यात शाळेच्या नियोजनासाठी त्या शाळेत गेल्या होत्या़ यावेळी इतर शिक्षक व कर्मचारीही उपस्थित होते़ या सर्वांकडून आरोग्य विभागाने माहिती घेतली आहे़ प्राचार्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आहे़कोरोनामुक्त असलेल्या तळोदा तालुक्यात ठाणे-मुंबई रिटर्नमुळे तब्बल सात जण एकाच वेळी पॉझिटिव्ह आल्यामुळे तळोदा शहरातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत़ अजूनही बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही़ यामुळे प्रशासनाने या सर्र्वांची माहिती घेऊन ठोस कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे़ नागरीकांनीही माहिती देण्याची गरज आहे़