शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सारंगखेडा यात्रोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी प्रशासनाची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : सारंगखेडा, ता.शहादा येथील एकमुखी दत्त यात्रोत्वास 11 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सारंगखेडा, ता.शहादा येथील एकमुखी दत्त यात्रोत्वास 11 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमिवर बुधवारी दत्त मंदिराच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे होते.या वेळी चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी सारंगखेडा यात्रोत्सव ग्लोबल झाला असून, यात्रेदरम्यान महिला भाविकांची उल्लेखनिय गर्दी असते. यात्रोत्सवास मोठ-मोठे सेलिब्रेटीही याठिकाणी आवजरून हजेरी लावत असतात. त्यामुळे या काळात वीज वितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा व ज्यादा क्षमतेचे रोहित्र बसवावे. यंदाही गेल्या वर्षी प्रमाणेच नियोजन असल्याने संबंधित सर्व विभागांनी सहकार्य करून फेस्टीवलसाठी आपले योगदान  द्यावे.याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सांगितले की, सारंगखेडा यात्रा ही पारंपरिक यात्रा असून, यात्रोत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. यात्रा काळात येणा:या पर्यटकांना सोयी-सुविधांबरोबर सुरक्षाही दिली जाईल. पोलीस प्रशासन कुठलाही अनुचित प्रकार घडू देणार नाही. यासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस, होमगार्ड व महिला पोलीसही नेमण्यात येणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले की, यात्रोत्सवात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. याठिकाणी रहदारी व वाहनांना अडथळा येवू नये यासाठी लेआऊटप्रमाणे व्यावसायिकांनी आपापली दुकाने थाटावीत. तसेच प्रत्येकाने अगिAरोधक यंत्रही दुकानात ठेवावे, अशा सूचना दिल्या. तसेच रस्त्यावरील व्यावसायिकांनी  बांधकाम विभागाच्या आदेशाचे पालन करावे. यात्रोत्सव काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदीची            कठोर अंमलबजावणी करण्यात येईल.यात्रा काळात धुळ्याकडून येणारी वाहने दोंडाईचा-नंदुरबार मार्गे वळविण्यात येतील तर अंकलेश्वर-तळोदाकडून येणारी वाहने अनरद बारी मार्गे शिरपूरकडून कळविण्यात येतील. जागो जागी रहदारी व अडथाळा रोखण्यासाठी कंट्रोल रूम असेल. प्रत्येक विभागाचे कर्मचारी या विभागात कार्यरत असतील.घोडे बाजार, भांडी बाजार व विविध ठिकाणी पोलीस चौकीसह मदत केंद्र उभारले जाईल. यात्रोत्सवात आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने व्यावसायिकांना दोन दिवस कोरडा दिवस पाळण्याचे सूचना कराव्यात. तसेच प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचा:यांनी आपापले भ्रमणध्वनी कार्यान्वित ठेवावे.बैठकीत प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी पशुसंवर्धन विभागाने कमी कर्मचा:यांचा मुद्या उचलत बाहेरून उच्च शिक्षित व घोडय़ांचे तज्ज्ञ डॉक्टर मागवून घोडय़ांची आरोग्याची कायजी घेण्याच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे यात्रा  कालावधीत अगिAशमन दलाच्या गाडय़ा तत्पर ठेवाव्यात. तसेच नंदुरबार, शहादा, तळोदा व शिरपूर पालिकेनेच रोटेशन पद्धतीने आपापले अगिAशामक बंद तत्पर ठेवावेत. ग्रामविकास विभागाने जागा देतांना दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने कर्मचारी व्यस्त राहतील. त्यामुळे प्रत्येकाने दिलेली जबाबदारी  चोखपणे पार पाडावी व प्रत्येक विभागाने पथकांतील कर्मचा:यांचा मोबाईल नंबर एकमेकांजवळ  ठेवावेत.बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता साळुंखे, पशुसंवर्धन अधिकारी अभिषेक पेंढारकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन पटेल, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, ईश्वर पाटील, यु.एस. भोई, भिक्कन पाटील, अजरुन पाटील, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन गटविकास अधिकारी सी.टी. गोसावी तर आभार सारंगखेडा ग्रामपंचातीचे ग्रामसेवक पी.डी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी चेतक फेस्टीवल समितीचे सदस्य व ग्रामपंचात कर्मचा:यांनी परिश्रम घेतले. यानंतर सर्व अधिकारी व कर्मचा:यांनी घोडे बाजार व यात्रा परिसराची पाहणी केली.