शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी प्रशासन अलर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते या शक्यतेने जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. चारही विधानसभा मतदारसंघांसाठी नेमलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपापल्या क्षेत्रात आढावा बैठकी घेतल्या. मध्यप्रदेश आणि गुजरात सिमेवरील लगतच्या जिल्ह्यांच्या बॉर्डर मिटिंगा देखील सुरू आहेत.    विधानसभा निवडणुकीच्या घोषणेकडे सर्वाचेच लक्ष लागून आहे. घोषणा होऊन आचारसंहिता कधीही लागू शकते या शक्यतेने प्रशासनासह राजकीय पक्षांनीही तयारी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज बैठकांचे सत्र सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून तयारीचा आढावा घेतला जात आहे. यामुळे प्रशासकीय स्तरावर लगबग सुरू झाली आहे. अधिका:यांची नियुक्तीचारही विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निर्णय अधिका:यांची नेमणूक करण्यात आली असून संबधीत अधिका:यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. स्थानिक स्तरावर मतदार यादी जाहीर करणे, आवश्यक कर्मचारी व मणुष्यबळाची जुळवाजुळव, वाहनांचे अधिग्रहण, मतदान केंद्रांची स्थिती आणि बंदोबस्ताचे नियोजन याची माहिती घेतली जात आहे. बॉर्डर मिटिंगानंदुरबार जिल्हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवर आहे. त्यामुळे आंतरराज्य सिमेवर निवडणूक काळात विशेष दक्षता घ्यावी लागते. ही बाब लक्षात घेता चारही विधानसभा मतदारसंघाच्या पोलीस अधिका:यांनी बॉर्डर मिटिंगा घेण्यास सुरुवात केली आहे. नवापूर मतदारसंघाला गुजरातची हद्द, नंदुरबार मतदारसंघाला गुजरातसह धुळे जिल्ह्याची हद्द लागून आहे. अक्कलकुवा मतदारसंघाला गुजरातसह मध्यप्रदेश तर शहादा मतदारसंघाला देखील गुजरात व मध्यप्रदेश सिमा लागून आहे. त्यामुळे चारही मतदारसंघात विशेष दक्षता घेतली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे किमान 17  ठिकाणी चेकपॉईंट तयार करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सव्र्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. भरारी पथकांचीही नियुक्तीनिवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर खर्च, आचारसंहिता आणि इतर बाबींसाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर होताच ही पथके कार्यान्वीत होणार आहेत. त्यासंदर्भात जिल्हाधिका:यांनी बैठक घेवून आवश्यक त्या सुचनाही दिल्या  आहेत.