शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या रणांगणातील शांततेमुळे कार्यकर्ते संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर होऊन देखील जिल्ह्यातील राजकीय पातळीवर सन्नाटा दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर होऊन देखील जिल्ह्यातील राजकीय पातळीवर सन्नाटा दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी अद्यापही गांभिर्याने घेतले नसल्याने कार्यकत्र्यामध्ये चलबिचलता वाढली आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यानंतर आता तरी राजकीय नेतेमंडळी कार्यकत्र्याना विश्वासात घेवून निवडणुकीच्या तयारीला लागतील अशी अपेक्षा कार्यकत्र्याकडून व्यक्त होत आहे.  नंदुरबार जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच जाहीर झाली. प्रत्यक्षात निवडणुकीचे कामकाज अर्थात अर्ज दाखल करण्याची कार्यवाही ही 18 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. यात बराच कालावधी असल्यामुळे राजकीय पातळीवर सध्या शांतता दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ता स्थापनेचा संघर्षामुळे सर्वच नेतेमंडळी आणि पदाधिकारी मुंबई येथे ठाण मांडून होते. आता सत्तापेच सुटल्यानंतर तरी निवडणुकांबाबत राजकीय पक्षांनी कार्यकत्र्यामधील चलबिचलता संपवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.कार्यकत्र्यामध्ये उत्सूकताबदलत्या राजकीय परिस्थितीमुळे सर्वच पक्षांमधील कार्यकत्र्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीविषयी प्रचंड उत्सूकता लागून आहे. आघाडी होते का?, पक्षीय पातळीवर आणि चिन्हावर निवडणूक लढविली जाते का? कुणाला तिकीट मिळेल यासह विविध प्रश्न कार्यकत्र्याच्या मनात निर्माण होत आहेत. गावागावात याबाबत चर्चा आणि तर्कवितर्काना उधान आले आहे. राजकीय पक्षांमधील निणर्यावर गट आणि गणातील उमेदवारी अवलंबून असल्याने अनेकजणांना निर्णयाची प्रतिक्षा लागून आहे. बैठका नाही, मार्गदर्शन नाही..निवडणुकीसंदर्भात बैठका नाही, कार्यकत्र्याना मार्गदर्शन देखील केले जात नाही. यापूर्वी काही पक्षांनी तालुकानिहाय मेळावे घेवून कार्यकत्र्याना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यात राजकीय वातावरण आणि परिस्थिती पुर्णपणे बदलल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते सैरभर झाले आहेत. भाजपने 26 रोजी निवडणुकांसंदर्भात व्यापक बैठक आयोजित केली होती. परंतु मुंबईतील राजकीय घडामोडींमुळे अनेक पदाधिकारी तेथे गेल्याने बैठक ऐनवेळी रद्द करावी लागली. आता लवकरच ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेच्या गोटात देखील शांतता आहे. काँग्रेसही सत्ता स्थापनेच्या पेचात अडकल्याने नेतेमंडळी मुंबईत होती. राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू असला तरी निवडणुकीबाबत आहे ते पदाधिकारीही उत्सूक आहेत. इतर लहान मोठय़ा पक्षांमध्येही तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेचे 56 गट व पंचायत समितीचे 112 गण आहेत. जास्तीत जास्त पंचायत समिती ताब्यात याव्या यासाठी राजकीय पक्षांचा प्रय} राहील. जिल्हा परिषद देखील ताब्यात यावी यासाठी प्रयत्न होतील. परंतु राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीमुळे नेतेमंडळी देखील संभ्रमात आहेत.निवडणूक प्रक्रिया अवघ्या 15 ते 20 दिवसांवर येवून ठेपली आहे. कार्यकत्र्यामध्ये उत्सूकता आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवर बैठका होऊन कार्यकत्र्यामधील संभ्रम दूर केला पाहिजे. आवश्यक त्या रणनितीसाठी व्यापक बैठक घेवून तयारी केली गेली पाहिजे. -अभिजीत पाटील, माजी जि.प.सदस्य.