शहाद्यात ५० दुचाकी चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:46 PM2020-04-03T12:46:54+5:302020-04-03T12:47:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कारण नसताना विनाकारण शहरात फिरू नका, ...

 Action on two-wheeler driver | शहाद्यात ५० दुचाकी चालकांवर कारवाई

शहाद्यात ५० दुचाकी चालकांवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कारण नसताना विनाकारण शहरात फिरू नका, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत होते. तरीही दुचाकींची संख्या कमी न होता वाढतच होती. त्यानुसार प्रशासनाने बुधवार व गुरुवारी विनाकारण फिरणाऱ्या ५० जणांची दुचाकी जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजाराप्रमाणे ५० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्यात अत्यावश्यक सेवा सुविधा वगळण्यात आलेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना सूट देण्यात आलेली आहे. त्याचा काही जण गैरफायदा घेताना दिसतात. एकदा भाजीपाला, किराणा भरल्यानंतर किमान सात ते आठ दिवस घराबाहेर पडू नये असे असताना दररोज किराणा, भाजीपाला घेणाऱ्यांची संख्या वाढतेच कशी हादेखील प्रश्न आहे. आपल्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानात पायी जाऊन एकाने जीवनावश्यक वस्तू आल्यानंतर पुन्हा पुन्हा जाण्याची आवश्यकता नसते. हे लक्षात आल्याने प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासनाने अशा विनाकारण फिरणाºयांवर कारवाई करत त्यांना लाठीचा प्रसाद दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेट बँक चौक परिसरात विनाकारण फिरणाºया ५० दुचाकी वाहनांवर कारवाई करत जुन्या पोलीस स्टेशनला वाहने जमा करण्यात आले आहेत. जनता कर्फ्यू लावल्यापासून प्रशासनाच्या वतीने वारंवार कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात येत होते. तरीही काही हुल्लडबाजी करत गावात फिरत होते. यामुळे रस्त्यांवर दुचाकींची संख्या वाढल्याने प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचाºयांनी ही कारवाई केली. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायला एकट्यानेच घराबाहेर पडावे. मुलगा किंवा महिलेला सोबत आणू नये. तसेच जे काही विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत व गल्लीबोळात गर्दी करून बसत आहेत. अशांवर कारवाई करत वाहने जमा करण्याची मोहीम सुरू केली आहे.
-डॉ.चेतन गिरसे, प्रांताधिकारी, शहादा.
पोलिसांच्या वतीने विविध भागात जाऊन कारण नसताना बाहेर पडू नका अशा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. तरीही काही कारण नसताना बाहेर पडत आहेत व सर्वांचे जीव धोक्यात घालत आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.
-किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक, शहादा.


अक्कलकुवा शहरात विनाकारण भटकाणाऱ्यांवर कारवाई, १७ दुचाकी जप्त


अक्कलकुवा येथे पोलीस उप अधीक्षक विक्रम कदम, व तहसीलदार विजय कच्छवे यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी दोन दिवसात १७ मोटारसायकली जप्त त्यांच्या करुन त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच विनाकारण फिरणाºया तिघांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ अक्कलकुवा शहरात सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत ेिठकेिठकाणी नाकाबंदी करून पॉर्इंट लावण्यात आले आहेत. अशा ठिकाणी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालक आढळून आल्यास आधी त्याची चौकशी करुन त्या जमा करण्याचे सत्र सुरु आहे़ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन, हेड कॉन्स्टेबल शिरसाळे, मोहने वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय धनगर, शरद पाटील, कन्हैयालाल परदेशी यांनी ही कारवाई केली़

Web Title:  Action on two-wheeler driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.