बोरद आरोग्य केंद्राच्या मोबाईल मेडीकल युनिट गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:14+5:302021-03-15T04:28:14+5:30

बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डाॅ. रेखा शिंदे यांच्या कार्यकाळात २०१६-१७ या काळात बोरद ...

Action should be taken against those who misbehave in the mobile medical unit of Borad Health Center | बोरद आरोग्य केंद्राच्या मोबाईल मेडीकल युनिट गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई व्हावी

बोरद आरोग्य केंद्राच्या मोबाईल मेडीकल युनिट गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई व्हावी

बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डाॅ. रेखा शिंदे यांच्या कार्यकाळात २०१६-१७ या काळात बोरद येथे मोबाईल मेडिकल युनिटची मान्यता देण्यात आली आहे. युनिटसाठी केंद्र शासनाकडून रुग्ण कल्याण समितीमार्फत निधी उपलब्ध होता. दरम्यान, या युनिटमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता निदर्शनास आली होती. संबंधित वैद्यकीय अधिकारी डाॅ. शिंदे यांनी वित्त विभागाकडील महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियमांचा भंग केला आहे. याप्रकरणी नियुक्त समितीने चाैकशी केल्यावर त्या दोषी आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यातून त्यांच्यावर बडतर्फी, गुन्हा दाखल करणे किंवा सेवेतून कमी करण्याची कारवाई होणे निश्चित करण्यात आले होते. परंतु जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने या गैरव्यवहारातील दोषींना शिक्षा मिळालेली नाही. यामुळे या प्रकरणी तातडीने चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावीत यांच्याकडून करण्यात आली आहे. चाैकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Web Title: Action should be taken against those who misbehave in the mobile medical unit of Borad Health Center