अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे चार वर्षांचे पुन्हा लेखापरीक्षण करून कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST2021-07-28T04:32:29+5:302021-07-28T04:32:29+5:30

हे लेखा परीक्षण केवळ १५ दिवसात करण्याचे आदेश असून लेखा परीक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेला दिल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. ...

Action order after re-audit of Akkalkuwa Gram Panchayat for four years | अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे चार वर्षांचे पुन्हा लेखापरीक्षण करून कारवाईचे आदेश

अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे चार वर्षांचे पुन्हा लेखापरीक्षण करून कारवाईचे आदेश

हे लेखा परीक्षण केवळ १५ दिवसात करण्याचे आदेश असून लेखा परीक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेला दिल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.

ग्रामपंचायतीत ३ कोटी १७ लाख ३५ हजार ४६२ रूपयांची अनियमितता असल्याचे स्पष्ट झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांना पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

ग्रामपंचायतीत विकास कामे करताना मूल्यांकनापेक्षा अधिक रक्कम खर्च केल्याने ग्रामविकास ग्रामविस्तार अधिकारी, प्रशासक व सरपंच यांच्याकडून १५लाख २७ हजार ८०१रूपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश अक्कलकुवा गटविकास अधिकारी यांना देण्यात आले होते.

तसेच ५९ लाख ८५ हजार ५०० रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तत्कालीन व विद्यमान सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्योच आदेश देण्यात आले होते. या विरोधात ग्रामविकास विभागात संबधितांनी अपील केले होते. २९ रोजी या अपीलावर सुनावणी होऊन स्थगिती उठवण्यात आली आहे.

Web Title: Action order after re-audit of Akkalkuwa Gram Panchayat for four years