शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्यांवर तळोद्यात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तोंडाला मास्क न लावता भाजीपाला विकून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली करणाऱ्या तळोद्यातील तीन भाजी विक्रेत्यांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तोंडाला मास्क न लावता भाजीपाला विकून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली करणाऱ्या तळोद्यातील तीन भाजी विक्रेत्यांवर बुधवारी पालिका प्रशासनाने प्रथमच दंडात्मक कारवाई केल्यामुळे भाजी विक्रेत्यांमध्ळे प्रचंड खळबळ उडाली आहे. व्यासायिकांनी मास्क व डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगरपालिकेने शहरातील भाजी व फळ विक्रेते गणपती मंदिर, विमल नगर, जोशीनगर, कचरा डेपो समोरील जागा, विद्यानगरी, प्रतापनगर, अशा वेगवेगळ्या आठ ठिकाणी स्थलांतर केले आहे. साहजिकच यामुळे सातत्याने भाजीमार्केटमध्ये होणाºया गर्दीस आळा बसला आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी सपना वसावे, प्रशासकीय अधिकारी विजय सोनवणे, आरोग्य निरीक्षक डिगंबर माळी, राजेंद्र माळी यांनी बुधवारी सकाळी या सर्व भागामध्ये जावून पाहणी केली. गणपती मंदिर जवळील तीन भाजी विक्रेत्यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. याशिवाय तेथे गर्दीदेखील करण्यात आली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचीही पायमल्ली करण्यात आली होती.साहजिकच या विक्रेत्यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना प्रत्येकी ५०० रुपये या प्रमाणे १५०० रूपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. पालिका प्रशासनाने प्रथमच मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे भाजी व फळ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तथापि पालिकेने यात सातत्य राखण्याची अपेक्षा केली जात आहे. तरच विक्रेत्यांवर वचक राखता येईल.गर्दी टाळण्यासाठी भाजी विक्रेत्यांना शहरातील वेगवेगळ्या आठ जागा निश्चित केल्या असल्या तरी प्रतापनगर, जोशीनगर या ठिकाणी भाजी विक्रेते भाजी विक्रीस उभे राहत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव वसाहतीतील रहिवाशांना इतर ठिकाणी गर्दी करावी लागत आहे. पालिकेने ज्या भाजी विक्रेत्यांची नेमणूक केली होती त्यांना त्या ठिकाणी भाजीपाला विक्री बाबत कडक समज द्यावी, दरम्यान येथील कृषी विभागानेदीखल घरपोच भाजीपाला देण्याची व्यवस्था केली होती. तथापि नेमून दिलेला शेतकरी गट एकच दिवस वसाहतीत आला. त्यानंतर आलाच नाही. त्यामुळे प्रशासनाने दखल घेण्याची मागणी आहे.