जुगार खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST2021-05-05T04:49:34+5:302021-05-05T04:49:34+5:30

नंदुरबार : संचारबंदी काळात जुगार खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई करीत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील ...

Action against seven gamblers | जुगार खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई

जुगार खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई

नंदुरबार : संचारबंदी काळात जुगार खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई करीत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधी काॅलनीतील गरीबदास चौकात पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपनगर पोलिसांनी धाड टाकली असता तेथे ५२ पत्त्यांचा जुगार सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी जुगाराचे साहित्य व १९०० रुपये रोख जप्त केले.

याबाबत पोलीस कर्मचारी अतुल गावीत यांनी फिर्याद दिल्याने किशोर रोजमल सिंधी, दीपक नाऊमल थारानी, मुकेश चंदलाल सिंधी, संजय ब्रिजलाल साहित्या, विनोद राधामल दावानी, कुमार नंदलाल थारानी व अनिल शीतलदास सिंधी सर्व रा. सिंधी काॅलनी यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार मनोज सरदार करीत आहे.

Web Title: Action against seven gamblers