मॉर्निंग वॉक करणाऱ्या २४ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:08 IST2020-04-13T12:08:07+5:302020-04-13T12:08:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी काळातही मॉर्निंग वॉकसाठी जाणाºया महिला व पुरुषांसह एकुण २४ जणांविरुद्ध पोलिसात आपत्ती व्यवस्थापन ...

Action against 3 men who did the Morning Walk | मॉर्निंग वॉक करणाऱ्या २४ जणांवर कारवाई

मॉर्निंग वॉक करणाऱ्या २४ जणांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संचारबंदी काळातही मॉर्निंग वॉकसाठी जाणाºया महिला व पुरुषांसह एकुण २४ जणांविरुद्ध पोलिसात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संचारबंदी काळात मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉकसाठी बाहेर पडू नका असे आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्यामुळे आता पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी जानता राजा चौक, धुळे चौफुली, कोकणीहिल परिसर, करण चौफुली, नवापूर चौफुली, वळण रस्ता या भागात ही कारवाई केली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये शिराज साबीर खाटीक, जाकीर शेख हुसेन, सलिम हुसेन पिंजारी, अरविंद संभाजी शार्दुल, अजीतकुमार पंपलकुमार, उदय प्रेमानंद सोनार, दिलीप दुसाने, विजय दशरथ पाटील, वैभव जगन्नाथ भारती, संजय हरिभाऊ मराठे, आनंदराव सुक्राम पाटील, चतुर कौतिक धनगर, वसंत ओंकार चौधरी, सुभाष नारायण वाडिले, नाना भगवान जोशी, राजेंद्र आनंदराव पाटील, लताबाई अभंगे, माया मराठे, जयश्री मराठे, शगुप्ता पिंजारी, छाया माळी, सुशिला घरटे, मयुरी घरटे, तबसू खाटीक, विलास गणपतसिंग राजपूत, सुधीर गावीत यांचा त्यात समावेश आहे.
दरम्यान, नागरिकांनी सकाळी व सायंकाळी फिरतांना काळजी घ्यावी. विनाकारण गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. बाहेर निघतांना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे आवश्यक असल्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Action against 3 men who did the Morning Walk