जामिनावरील 18 वर्षापासून फरार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 01:00 PM2019-11-23T13:00:51+5:302019-11-23T13:00:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जबरी चोरीतील गुन्ह्यातील जामिनावर सुटलेला व 18 वर्षापासून फरार असलेल्या संशयीताला स्थानिक गुन्हा अन्वेशन ...

Accused arrested for 18 years on bail | जामिनावरील 18 वर्षापासून फरार आरोपीस अटक

जामिनावरील 18 वर्षापासून फरार आरोपीस अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जबरी चोरीतील गुन्ह्यातील जामिनावर सुटलेला व 18 वर्षापासून फरार असलेल्या संशयीताला स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील बडवाणी येथे जावून शिताफीने अटक केली. 
सारंगखेडा पोलीस   ठाण्याअंतर्गत 2002 मध्ये जबरी चोरीचा गुन्हा घडून तो दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयीत शेरसिंग रतनसिंग तडवी, रा.बलखड, जि.बडवाणी यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. जामिनावर सुटल्यानंतर तो फरारच होता. 18 वर्षापासून त्याचा शोध सुरू होता. त्याला दोन वॉरंट काढून फरार घोषीत करण्यात आले होते. 
संशयीत शेरसिंग तडवी याच्या ठावठिकाणाची माहिती एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला त्याचा शोध घेण्यासाठी रवाना     केले. तडवी हा गावी ये-जा करून राहत असल्याचे समजले.    पथकातील कर्मचा:यांनी परिसरातील शेतांमध्ये मजुर म्हणून काम करून त्याची सर्व माहिती काढली. 21 नोव्हेंबर रोजी शेरसिंग तडवी हा शेतात काम करण्यासाठी आला असता पथकाने त्यास शिताफीने अटक  केली. 
यासाठी त्यांना बडवाणी पोलीस ठाण्याचे निरिक्षक राजेश यादव, उपनिरिक्षक एम.एस.डावर, हिरुसिंग रावत, बलविरसिंग मंडलोई, अंतरसिंग रावत यांनी सहकार्य केले. 
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले व पथकाने केली. 

Web Title: Accused arrested for 18 years on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.