खांडबारा परिसरात घरांच्या दुरूस्ती कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST2021-05-16T04:29:52+5:302021-05-16T04:29:52+5:30

खांडबारा : यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात ...

Accelerate the repair work of houses in Khandbara area | खांडबारा परिसरात घरांच्या दुरूस्ती कामाला वेग

खांडबारा परिसरात घरांच्या दुरूस्ती कामाला वेग

खांडबारा : यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात नागरिक घराच्या छताची डागडुजी करत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा मान्सून हवामान खात्याने लवकरच वर्तविला आहे. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत दुकाने उघडी राहतात. म्हणून कामासाठी लागणाऱ्या वस्तू वेळेत मिळाव्यात यासाठी देखील धावपळ करावी लागते. यातून शेती कामे ही कमी झाल्याने अनेकजण घराच्या छतांच्या दुरुस्तीची कामे काढून ती पूर्ण करत असल्याचे दिसून आले आहे. घराच्या छतावरील डागडुजी सुरू केलेली आहे. ज्यांच्या घराच्या छतावरील पत्रे खराब झाले आहेत, त्यांच्याकडून पत्रे बदलण्याचे काम सुरू झाले आहे. जुने पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन पत्रे लावण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी खराब झालेल्या पत्र्यावर डांबर लावून गळती थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुपारी उन्हाचे चटके लागतात म्हणून हे काम सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा वाजल्यानंतर केले जात आहे. यामुळे काम करताना गारव्याचा विचार केला जात आहे. खांडबारा व परिसरातील गावांमध्ये सध्या ही कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान लाॅकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने विविध वस्तूंची खरेदी होत नसल्याने जुन्याच वस्तूंचा वापर करण्याची वेळ अनेकांवर आली आहे.

Web Title: Accelerate the repair work of houses in Khandbara area