जिल्ह्यातील ९० हजार महिलांना मिळणार उज्ज्वला गॅसचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:32 IST2021-02-20T05:32:39+5:302021-02-20T05:32:39+5:30

नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतराचे प्रमाण अधिक असल्याने स्थलांतर करणाऱ्या आदिवासी कुटुंबांचे सर्वेक्षण केंद्र शासनाने केले होते. यातून यातील ५६ हजार ...

90,000 women in the district will get the benefit of Ujjwala Gas | जिल्ह्यातील ९० हजार महिलांना मिळणार उज्ज्वला गॅसचा लाभ

जिल्ह्यातील ९० हजार महिलांना मिळणार उज्ज्वला गॅसचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातून स्थलांतराचे प्रमाण अधिक असल्याने स्थलांतर करणाऱ्या आदिवासी कुटुंबांचे सर्वेक्षण केंद्र शासनाने केले होते. यातून यातील ५६ हजार सर्वेक्षित कुटुंबाना एक देश एक रेशनकार्ड योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पानुसार नंदुरबार जिल्ह्याला देशातील ६०२ जिल्ह्यात स्थान देण्यात येऊन सुसज्ज दर्जाचे क्रिटीकेअर हॉस्पिटल मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रासाठीच एकात्मिक आरोग्य शाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर यातांत्रिक शाळा लवकरच सुरु होतील. तसेचपोषण अभियान २.० अंतर्गत आकांक्षित जिल्हा म्हणूनही नंदुरबार जिल्ह्याला विशेष लाभ देण्याची घोषणा करण्यात आल्याची माहिती खासदार डाॅ.हीना गावीत यांनी दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात सुसज्ज अशी सैनिकी शाळा आणि एकलव्य स्कूलसाठी वाढीव निधीही देण्यात आहे. जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना चालना मिळावी, यासाठी येत्या मेडिकल डिव्हाईस पार्क निर्मितीसाठी केंद्रीय मंत्री सदानंद गाैडा यांच्यासोबत चर्चा करुन देशातील सहा पार्कपैकी एक पार्क हे नंदुरबार जिल्ह्यात स्थापन करण्याची मागणी केली आहे. या पार्कमध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या विविध यंत्रांची निर्मिती होणार आहे. यातून देशातील वैद्यकीय क्षेत्रात अधिक सुसज्जता येणार आहे. हे पार्क नंदुरबार जिल्ह्यात सुरू झाल्यास जिल्ह्यातील बेरोजगारी दूर होऊन देशात नाव उज्ज्वल होणार असल्याचेही खासदार डाॅ. गावीत यांनी सांगितले.

दरम्यान शेवटी जिल्ह्यातील रस्ते विकासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 90,000 women in the district will get the benefit of Ujjwala Gas