लॉकडाऊन काळात ९२ हजाराचे अवैध मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:35 PM2020-04-03T12:35:58+5:302020-04-03T12:36:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नवापुर चौफुली परिसरातील हॉटेलमध्ये देशी विदेशी दारुची चोरटी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ...

90 thousand illegal liquor seized during lockdown | लॉकडाऊन काळात ९२ हजाराचे अवैध मद्य जप्त

लॉकडाऊन काळात ९२ हजाराचे अवैध मद्य जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील नवापुर चौफुली परिसरातील हॉटेलमध्ये देशी विदेशी दारुची चोरटी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने धाड टाकून ९२ हजार रुपयांचे अवैध मद्य जप्त केले़ बुधवारी पथकाने ही कारवाई केली़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सर्व मद्याची दुकाने व हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश आहेत़ दरम्यान बुधवारी नवापुर चौफुली परिसरातील साक्री रोडवर हॉटेल छोटीमध्ये अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर नवाले यांना मिळाली होती़ त्यांनी येथे छापा टाकून ९२ हजार ९०५ रुपयांचे अवैध मद्य जप्त केले़ याबाबत संशयित कमलेश रमणलाल जयस्वाल रा. वेडु गोविंद नगर व वर्षा प्रकाश चौधरी रा. चौधरी गल्ली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दोघांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे़

Web Title: 90 thousand illegal liquor seized during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.