शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या ९० कोटींचा प्रस्ताव आयुक्तांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र असूनही पीक कर्ज न मिळणाऱ्या १३ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र असूनही पीक कर्ज न मिळणाऱ्या १३ हजार शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने शिखर बँकेकडे ९० कोटी रुपयांची मागणी केली आहे़ या मागणीला अधिक जोर यावा यासाठी बँकेने नाशिक विभागीय आयुक्त यांनाही प्रस्ताव दिला आहे़विभागीय आयुक्त यांना देण्यात आलेल्या प्रस्तावात नंदुरबार जिल्ह्यातील कृषी कर्जमाफी योजनेत समाविष्ट असलेल्या १३ हजार ३६८ सभासद शेतकºयांचे मागील कर्ज माफ करुन त्यांना आगामी वर्षातील कर्ज देण्याची प्रक्रिया करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे़ आयुक्तांनी याबाबत शिखर बँकेकडे पाठपुरावा करावा अशी अपेक्षा बँकेने व्यक्त केली आहे़ दरम्यान राज्यातील पाच जिल्हा बँकांनी शिखर बँकेकडे निधी मागणी केली असून त्यात धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचा समावेश आहे़ आयुक्तांच्या सूचनेनंतर प्राप्त होणाºया ९० कोटी रुपयांच्या रकमेला ३० जून उजाडणार असल्याची माहिती आहे़ यामुळे १३ हजार शेतकºयांना पीक कर्जाविनाच खरीप पेरण्या कराव्या लागणार असल्याची चिन्हे आहेत़दरम्यान जिल्हा बँकेने आयुक्तांना दिलेला प्रस्ताव हा सर्व संचालक मंडळाचा ठराव करुन विभागीय आयुक्त यांच्याकडे दिला आहे़ आयुक्तांकडून या प्रस्तावावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ येत्या १५ दिवसात त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता असली तरी १३ हजार शेतकरी मात्र टांगणीला लागले आहेत़ एकीकडे जिल्हा बॅेकेकडून निधी मागणी करुन पाठपुरावा सुरु असताना दुसरीकडे जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांचे कामकाज मात्र पूर्णपणे थंडावले आहे़ आजअखेरीस केवळ पाच टक्के शेतकºयांना कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे़ कर्जमाफी बाबत बँकेच्या अधिकाºयांना विचारणा केली असता, ‘रिझर्व्ह बॅकेकडून कोणतेही आदेश नसल्याने’ कर्जपरतावा करणाºयांना कर्ज वाटप करत असल्याची माहिती देत आहेत़ शासनाकडून बँकांना वेळोवेळी आदेश देण्यात येत असतानाही त्यांच्याकडून कर्ज वितरणाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात आलेला नाही़ यातून जिल्ह्यातील शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे़ राष्ट्रीयकृत बँकाच्या या उदासिन धोरणामुळे जिल्ह्यातील ३५ हजार शेतकरी कर्जाला मुकले आहेत़ जिल्ह्यातील सर्व बँका मिळून यंदा ५७१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचा निर्धार करण्यात आला होता़ या स्थिती हा निर्धार फुसका बार ठरतो आहे़

जिल्हा बँकेने ९ जून पर्यंत ३ हजार ८१९ सभासद आणि १९० विविध कार्यकारी संस्था यांना ३४ कोटी ९२ लाख ४४ हजार रुपयांचे कर्ज दिले आहे़ हे सर्व शेतकरी आणि संस्था ह्या परतावा देणाऱ्या आहेत़दुसरीकडे ११ राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खाजगी बँकांनी मिळून आतापर्यंत १ हजार ५६६ शेतकऱ्यांना २२ कोटी २३२ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़ हे शेतकरी कृषीमुक्ती योजनेच्या बाहेरील आहेत़ परंतू कर्जमाफी योजनेतील शेतकºयांना मात्र कोणत्याही प्रकारचे या बँकानी दिलेले नाही़

विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे़ त्यावर कारवाई होवून शिखर बँकेकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे़ पाठपुरावा यशस्वी होणार आहे़ १३ हजार शेतकऱ्यांना शिखर बँकेने निधी दिल्यानंतर तात्काळ कर्ज वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे़-धीरज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक़