शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

लॅाकडाऊनच्या काळात आढळले ८४ एड्‌स रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 11:57 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   जिल्ह्यात एड्‌स बाधीतांची संख्या वाढत आहे. लॅाकडाऊनच्या काळात देखील जिल्ह्यात ८४ रुग्ण आढळले. ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   जिल्ह्यात एड्‌स बाधीतांची संख्या वाढत आहे. लॅाकडाऊनच्या काळात देखील जिल्ह्यात ८४ रुग्ण आढळले. जिल्ह्यात एड्‌स बाधीतांच्या कोरोना चाचणीसाठी देखील नियोजन करण्याची गरज आहे. दरम्यान, एड्‌स सप्ताहानिमित्त एड्‌स प्रतिबंधक व नियंत्रण पथकामार्फत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात देखील अर्थात एप्रिल ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात एड्‌स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाचे काम सुरू होते. सामान्य रुग्णांची तपासणी करण्याचे काम करून त्यातून एड्‌स बाधीतांना डिटेक्ट केले जात      होते. जिल्हा रुग्णालयातील    समुपदेशन केंद्र आणि उपचार केंद्रात कोरोना काळात देखील काम सुरू होते. याच काळात जिल्ह्यात विविध तपासणींमध्ये ८४ एड्‌स बाधीत आढळून आले आहेत.अशी झाली तपासणीकोरोना काळात जिल्ह्यात २५ हजार ३०० जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील ७८ जण एड्‌स बाधीत आढळून आले. तर २३ हजार ६६४ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली असता त्यातील सहा जण पॅाझिटिव्ह आढळून आले. दोन्ही मिळून ४८ हजार ९६४ जणांची तपासणी करण्यात आली   होती. कोरोना काळात एड्‌स बाधीतांच्या औषधोपचार आणि समुपदेशनात खंड पडू नये यासाठी एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण पथकाने विशेष काळजी घेतली. रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध करून देण्यात आली. कोरोना तपासणीएड्‌स बाधीतांची कोरोना तपासणी करण्याचे देखील नियोनज करण्यात आले आहे. परंतु अनेक रुग्ण यासाठी घाबरत असल्याचे चित्र आहे. ओळख पटू नये हे त्यामागचे कारण  असल्याचेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, एड्‌स सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

यंदा ॲानलाईन  यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एड्‌स सप्ताहाचे सर्व उपक्रम जागतीक एकता, सामायीक जबाबदारी हे ब्रिद वाक्य समोर ठेऊन राबविण्यात येत आहेत.  जनजागृतीचे सर्व कार्यक्रम हे ॲानलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. तसे नियोजन देखील करण्यात आले आहे.