शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

८२ बचत गट कर्जाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील ८२ महिला बचत गटांची कर्ज प्रकरणे आॅनलाईन प्रक्रियेने संबंधीत ग्रामीण भागातील बँकांमध्ये दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील ८२ महिला बचत गटांची कर्ज प्रकरणे आॅनलाईन प्रक्रियेने संबंधीत ग्रामीण भागातील बँकांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता संबंधीत बँक प्रशासनाने तातडीने पुढील कार्यवाही करून कर्जे उपलब्ध करून द्यावीत, अशी या बचत गटांची मागणी आहे. दरम्यान तालुक्याला दिलेल्या उद्दिष्टपूर्तीस अधिक गती देण्याची अपेक्षाही बचत गटांनी केली आहे.तळोदा पंचायत समितीमार्फत तालुक्यातील ग्रामीण भागात साधारण एक हजार ४०० महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. या बचत गटातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने महिला ग्रामोन्नती अभियान २०१७ पासून सुरू केले आहे. या अभियानामार्फत बचत गटातील महिलांना आपल्या गावाच्या कार्यक्षेत्रातील राष्टÑीकृत अथवा सहकारी बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देत असते. या अभियानाच्या माध्यमातूनच तळोदा तालुक्याला साधारण ३५० महिला बचत गटांचे कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट्य तळोदा पंचात समितीला देण्यात आले होते. मार्च महिन्यात हे उद्दिष्ट देण्यात आले होते.तथापि कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे बचत गटांच्या कागद पत्रांची जुळवणी करण्यात अडचणी आल्या होत्या, असे असले तरी तालुक्यातील ८२ बचत गटांनी आपल्या महिलांचे कागद पत्रांची पूर्तता करून आपल्या कार्यक्षेत्रातील बँकांमध्ये आॅनलाईन प्रणालीतून प्रस्ताव सादर केले आहेत. जवळपास ९० लाखांची कर्ज प्रकरणे महिला बचत गटांनी केले आहेत. आता त्यांना कर्जाची प्रतीक्षा लागून आहे. ज्या बँकांकडे कर्जाचे प्रस्ताव दाखल केले आहेत तेथील बँक प्रशासनाने त्यावर तातडीने पुढील कार्यवाही करण्याची अपेक्षा बचत गटातील महिलांनी केली आहे. कारण महिला बचत गटांच्या कर्ज मंजुरीबाबत बँक प्रशासन नेहमीच उदासिन भूमिका घेत असते. यासाठी महिलांना सतत बँकांकडे थेटे घालावे लागत असल्याचा अनुभव त्या सांगतात. एवढे करूनदेखील यश येत नसल्याची व्यथाही बचत गटातील महिलांनी बोलून दाखविली आहे. आता राज्य शासनाने बचत गटातील महिलांच्या सक्षमी करणासाठी विशेष अभियान सुरू केले आहे. त्यामुळेच महिला बचत गटातील महिलांमध्ये आपल्या कर्जाची आशा पल्लवीत झाल्या आहेत. तथापि यासाठी पंचायत समिती प्रशासनाबरोबर जिल्हा प्रशासनानेदेखील बँकांशी नियमित समन्वय ठेवून पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. ज्या बँका उदासिन भूमिका घेईल त्यांच्यावर कायदेशीर ठोस कार्यवाही करण्याची अपेक्षाही बचत गटांनी केली आहे. आधीच कर्ज प्रकरणी कागद पत्रांची जुळवणी करताना दमछाक करावी लागली होती.बचत गटातील प्रत्येक महिलांचे आधारकार्ड, पासपोर्ट फोटोज, बँक खाते व इतर तत्सम कागदपत्रे जमा करावीत लागली आहे. त्यामुळे बँक प्रशासनांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची अपेक्षा या महिलांकडून व्यक्त केली जात आहे.राज्य शासनाच्या महिला ग्रामोन्नती अभियानातून तळोदा तालुक्यातील ३५० महिला बचत गटांना कर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु त्यापैकी आतापावेतो केवळ ८२ बचत गटांची कर्जाची प्रकरणे बँकांमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. कोरोना महामारीमुळे या प्रक्रियेला बाधा आली असली तरी उद्दिष्ट पूर्तीसाठी गती देण्याची आवश्यकता आहे. संबंधीत यंत्रणा मेहनत घेत असली तरी बचत गटातील महिलांनीदेखील आपल्या कागद पत्रांच्या पूर्ततेसाठी त्यांना मदत केली पाहिजे. याशिवाय तालुक्यातील बचत गटांची संख्या लक्षात घेऊन वरिष्ठ प्रशासनानेही उद्दिष्ट्य वाढविण्याची महिला बचत गटांची मागणी आहे. तसे तळोदा तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. शिवाय आदिवासी महिला बचत गटांचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे कर्ज उद्दिष्ट्याबाबत संबंधीत यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा आहे.