शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेतील ८२ प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या सहा-सात महिन्यांपासून नवीन समितीचे पुनर्गठण व कोरोना महामारीमुळे रखडलेली संजय गांधी निराधार योजनेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या सहा-सात महिन्यांपासून नवीन समितीचे पुनर्गठण व कोरोना महामारीमुळे रखडलेली संजय गांधी निराधार योजनेच्या प्रस्तावांवर कार्यवाहीसाठी महसूल प्रशासनातर्फे संबंधीत यंत्रणांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत साधारण ८२ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. नवीन लाभार्थ्यांना आता पुढील महिन्यापासून लाभ मिळणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्यात महाविकास आघाडीचे शासन सत्तारूढ झाल्यानंतर जवळपास सर्वच अशासकीय समित्यांचे पुनर्गठण रखडले आहे. यात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी असलेली संजय गांधी निराधार समिती अपवाद ठरलेली नाही. त्यामुळे बैठक घेण्याबाबत प्रशासनाने सुद्धा उदासिन भूमिका घेतल्याचा आरोप केला जात होता. तब्बल सहा ते सात महिन्यापासून तळोदा तालुकास्तरीय समितीची बैठकदेखील रखडली होती. साहजिकच लाभार्थ्यांचे प्रस्ताव कार्यवाही अभावी तसेच कार्यालयात धुळखात पडले होते. साधारण १५० ते २०० लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल झाले होते.गेल्या अनेक महिन्यांपासून प्रस्तावांवर कार्यवाही होत नसल्यामुळे लाभार्थीही सारखे संजय गांधी कार्यालयात हेलपाटे मारत असत. त्यांना आज होईल, उदञया होईल, असे वायदे दिले जात असे. त्यानंतर कोरोेना महामारीच्या उद्रेकामुळे मिटींग रखडल्याचा बहाना केला जात होता. वैतागलेल्या काही लाभार्र्थींनी आपली कैफीयत लोकमतकडे मांडल्यानंतर गेल्या महिन्यात या संदर्भात वस्तुनिष्ठ वृत्त प्रकाशीत केले होते.या वृत्ताची दखल घेत येथील महसूल प्रशासनाने लगेच संजय गांधी निराधार यंत्रणेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दाखल झालेल्या १५० प्रकरणांवर कार्यवाही करून त्यातील १४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. उर्वरित प्रकरणांमध्ये त्रुटी असल्याने नामंजूर झाल्याचे सांगण्यात आले, असे असले तरी कागद पत्रांच्या पूर्ततेसाठी महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना ही कागदपत्रे पुन्हा नवीन काढण्यासाठी लाभार्थ्यांना मदत करण्याची सूचना प्रशासनाने देण्याची आवश्यकता आहे. कारण लाभार्थीस कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कोणीच मदत करीत नाहीत. त्यामुळे मिळाले त्या कागद पत्रांची पूर्तता करून जसा-तसा प्रस्ताव दाखल करून तो मोकळा होता. इकडे त्रुटींमुळे प्रस्ताव नाकारण्यात आल्यानंतर त्यांच्या अंगी नैराश्य येते. निदान याबाबत महसूल विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन लाभार्र्थींचा प्रस्ताव तयार करण्याची संबंधीत तलाठी अथवा ग्रामसेवकास सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी आहे. वास्तविक तालुक्यात दारिद्र्य रेषेखालील वृद्ध-निराधार दाम्पत्यांची संख्या मोठी आहे. परंतु या योजनेच्या लाभासाठी लागणारी कागद पत्रांची कटकटमुळे लाभार्थी प्रस्ताव दाखल करण्यास पुढे येत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी सकारात्मक दृष्टीकोन घेण्याची अपेक्षा आहे.या बैठकीत दाखल झालेल्या प्रस्तावावर तहसीलदार पंकज लोखंडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, संजय गांधी समितीचे नायब तहसीलदार पी.व्ही. अहिरराव यांनी कार्यवाही केली. दरम्यान, गेल्या सहा-सात महिन्यानंतर आपल्या रखडलेल्या प्रकरणांवर कार्यवाही होऊन प्रकरण मंजूर करण्यात आल्याने लाभार्थ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तथापि महसूल प्रशासनाने आता दाखल झालेल्या प्रस्तावांवर कार्यवाहीसाठी नियमितपणे बैठक घेण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.