शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील ७ जणांना सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रेमविवाह केल्याच्या वादातून जमावाने मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील सात जणांना तळोदा प्रथमवर्ग दंडाधिकारी यांनी ६ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रेमविवाह केल्याच्या वादातून जमावाने मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील सात जणांना तळोदा प्रथमवर्ग दंडाधिकारी यांनी ६ महिने सश्रम कारावास व एकत्रीत २४ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.तळोदा येथील ईस्माईल बागवान यांनी गावातीलच मलक सुलतान हुसेन यांच्या मुलीशी प्रेमविवाह केला होता. त्याचा राग मलक व त्यांच्या नातेवाईकांना आला होता. याबाबत तंटा मिटवून मुलीला वडिलांकडे सोपविण्यात आले होते. त्या वादातून ५ मे २००७ रोजी सकाळी साडेअकरा वाजता ईस्माईल बागवान यांना आठ जणांच्या जमावाने लोखंडी चेन, लाकडी दांडा, लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. नागरिकांनी जमावाच्या तावडीतून त्याची सुटका केली होती. याबाबत ईस्माईल बागवान यांनी तळोदा पोलिसात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीवरून ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरिक्षक सैय्यद यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र सादर केले होते. न्या.एस.डी.हरगुडे यांच्या समोर हा खटला चालला. त्यांनी एकुण पुरावे पहाता अलीम मलीक हुसेन, सोहेब मलीक हुसेन सुलतान, मलक विकार मलक रेहमान, मलक रहीम मलक हुसेन, मलक सुलतान मलक हुसेन, मलक हसीम मलक अफजल आणि अहमदखान रेहमानखान पिंजारी, रा.मलकवाडा, तळोदा यांना ६ महिने सश्रम कारावास व प्रत्येकी ३५०० रुपये असा एकुण २४,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.धिरजसिंह चौहान यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार रमेश साळी होते.