शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

69 हजार कुटूंब गॅस जोडणीपासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात 82 हजारापेक्षा अधिक गॅस जोडण्या देण्यात आल्या असून धुरमुक्त होण्याच्या दिशेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यात 82 हजारापेक्षा अधिक गॅस जोडण्या देण्यात आल्या असून धुरमुक्त होण्याच्या दिशेने जिल्ह्याची प्रगती सुरू आहे. असे असले तरी अद्यापही 69 हजार 518 कुटूंबांकडे गॅस नसल्याचे चित्र आहे. स्वच्छ इंधन, चांगले जीवन आणि महिलांचा सन्मान या तीन सुत्रावर आधारीत ही योजना आहे. योजनेअंतर्गत कुटुंबातील कत्र्या महिलेच्या नावाने मोफत गॅस जोडणी देण्यात येत आहे. गावांना धूर विरहीत बनविण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुरक्षित करण्याच्यादृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे. ही योजना महिलांसाठी विशेष ओळख ठरली आहे. जिल्ह्यात पुरवठा विभागातर्फे बीपीएल कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष प्रय} करण्यात येत आहेत. याशिवाय जे कुटुंब या योजनेच्या निकषात बसतात त्यांच्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विस्तारीत उज्वला योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत नंदुरबार तालुक्यातील 25 हजार 768, नवापुर 19 हजार 396, शहादा 17 हजार 249, तळोदा सात हजार 205, अक्कलकुवा सहा हजार 871 आणि अक्राणी तालुक्यातील पाच हजार 696 कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर 86 हजार 211 कुटुंब एक गॅसधारक आणि 58 हजार 367 कुटुंब दोन गॅसधारक आहेत. त्यामुळे गॅस जोडणी असलेल्या एकूण कुटुंबांची संख्या दोन लाख 25 हजार 947 झाली आहे. बिगर गॅसधारक 69 हजार 518 कुटुंब असून त्यांना उज्वला व विस्तारीत उज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अशा एक हजार 586 कुटुंबांना आतापयर्ंत गॅस जोडणी मंजूर करण्यात आली आहे. केवळ 100 रुपयात ही गॅस जोडणी देण्यात येणार असून त्यासाठी गॅस एजन्सीकडे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. गॅस जोडणी नसेलल्या कुटुंबांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.