६३० वनदावे जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:56+5:302021-04-02T04:31:56+5:30

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वैयक्तिक वनहक्क दावे पडताळणी करून दावे पात्र-अपात्रबाबत प्रांताधिकारी ...

630 forest claims sent to District Collector | ६३० वनदावे जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना

६३० वनदावे जिल्हाधिकाऱ्यांकडे रवाना

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वैयक्तिक वनहक्क दावे पडताळणी करून दावे पात्र-अपात्रबाबत प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली समितीतील सदस्यांची बैठक झाली. बैठकीत शहादा व अक्राणी तालुक्यातील वनदावे समितीपुढे ठेवण्यात आले. १२ गावांतील दाव्यांवर समितीतील सदस्यांनी तपासणी करून चर्चा केली. चर्चेअंती या दाव्यांमध्ये सबळ पुरावा दिसून न आल्याने तसेच दावेदाराचे वय कमी असल्याने समितीच्या सदस्यांनी एकमताने अक्राणी तालुक्यातील ६३० दावे पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला समितीचे सदस्य सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, सहायक प्रकल्प अधिकारी जिजाबाई पाडवी, शहाद्याचे तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, अक्राणीचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, गीताबाई पाडवी, दिलीप पाडवी, प्रकाश पावरा, राकेश पवार, प्रवीण गावित आदी सदस्य उपस्थित होते.

Web Title: 630 forest claims sent to District Collector