शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार आगाराला ६० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बसेस बंद असल्याने गेल्या सहा दिवसात राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराला ...

नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बसेस बंद असल्याने गेल्या सहा दिवसात राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराला तब्बल ६० लाख रुपयांचा फटका बसला आहे. ५२२ पैकी ५०० फेऱ्या बंद असल्याने आगाराला या नुकसानीची झळ सोसावी लागत आहे.

नंदुरबार शहरासह जिल्हाभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आता कोणत्याही भागात नजर फिरवली तर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या काळात सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. दुपारी एकनंतर संपूर्णपणे बंद पाळण्यात येत आहे.

या दरम्यान नंदुरबार आगाराच्या बसेसदेखील बंद ठेवण्याचा निर्णय आगाराने वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेतला आहे. त्याची १ एप्रिलपासून अंमलबजावणीही करण्यात येत आहे.

नंदुरबार आगाराच्या दिवसभरात एकूण ५२२ फेऱ्या होतात. आगार बंद असल्याने यातील ५०० फेऱ्या पूर्णपणे बंद आहेत. केवळ २२ फेऱ्या सुरू आहेत. यात जिल्हाअंतर्गत बसेस कार्यान्वित आहेत. यात तळोदा, अक्कलकुवा, शहादा, नवापूर, धडगाव याच बसेस सुरू आहेत. बंद असलेल्या ५०० फेऱ्यांमुळे नंदुरबार आगाराला प्रति दिनी साधारण १० लाख रुपयांचा फटका बसत आहे. याचा विचार केला तर १ ते ६ एप्रिल दरम्यान नंदुरबार आगाराचे सहा दिवसात तब्बल ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.