नांदुरी यात्रेसाठी नंदुरबार येथून 60 बस

By Admin | Updated: April 6, 2017 15:40 IST2017-04-06T15:40:00+5:302017-04-06T15:40:00+5:30

नांदुरी येथील संप्तश्रृंगी मातेच्या यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे यंदा 60 गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आह़े

60 buses from Nandurbar for Nandurbar yatra | नांदुरी यात्रेसाठी नंदुरबार येथून 60 बस

नांदुरी यात्रेसाठी नंदुरबार येथून 60 बस

 नंदुरबार,दि.6- नांदुरी येथील संप्तश्रृंगी मातेच्या यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे यंदा 60 गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आह़े यासाठी आगाराला 17 लाख 50 हजार रुपयांच्या महसूलाचे उद्दिष्टय़ देण्यात आले आह़े

दरवर्षी नांदुरी यात्रेसाठी मोठय़ा संख्येने भाविक जात असतात़ यासाठी परिवहन महामंडळातर्फे जादा गाडय़ांची सोय करण्यात येत असत़े त्याचप्रमाणे यंदाही भाविकांची संख्या लक्षात घेता नंदुरबार आगाराकडून 60 बसेस्ची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आगार प्रमुख निलेश पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली़ 
दरम्यान लवकरच उन्हाळी जादा वाहतूक बसेस्देखील सुरु करण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार आगाराकडून देण्यात आली आह़े यात सुरत, महाळ, वापी वलसाळ, ठाणे या ठिकाणी 12 बसेस्चे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली़ या बसेस् 15 एप्रिलपासून सुरु करण्यात येणार आह़े 
(वार्ताहर)

Web Title: 60 buses from Nandurbar for Nandurbar yatra