शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावात ५३२ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील कलसाडी व असलोद महसूल मंडळात शुक्रवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे सुमारे ५३२ ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील कलसाडी व असलोद महसूल मंडळात शुक्रवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे सुमारे ५३२ घरांची पडझड व पत्रे उडालेले आहेत. यात सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या केळी, पपई, ऊस या पिकांचे अंदाजे ६५ ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे घरांचे व शेतपिकांचे सुमारे एक कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.गेल्या अडीच-तीन महिन्यापासून कोरोना विषाणू या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाईन करण्यात आल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक क्षेत्र मंदावलेले होते. शेतकऱ्यांची विक्रीसाठी तयार झालेली पपई व केळी शेतातच नाशवंत होऊन करोडो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर गेल्या शुक्रवारी शहादा व तळोदा तालुक्यातील काही भागात आलेल्या वादळाने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. शहादा तालुक्यातील कलसाडी महसूल मंडळातील सोनवलतर्फे बोरद, नांदर्डे, काथर्दे दिगर, कलसाडी, भादे, वैजाली, करणखेडा या सात गावांना या वादळी वाºयाचा जोरदार तडाखा बसला. मिळालेल्या माहितीनुसार, सोनवल गावात १५५ घरांचे छप्पर उडालेली आहेत. यामुळे चार लाख १७ हजार २०० रुपयांचे नुकसान तर ७७ घरांच्या पूर्ण नुकसानीमुळे १३ लाख ७४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. नांदर्डे गावात १८ घरांची अंशत: पडझड झाल्याने २९ हजार ४०० रुपयांचे तर दोन घरांचे पूर्णत: नुकसान होऊन १७ हजार ८०० रुपयांचे नुकसान झालेले आहे. काथर्दे गावात १०३ घरांचे अंशत: नुकसान होऊन दोन लाख ९९ हजार ६०० तर पूर्णत: नुकसान झालेल्या घरांचे एक लाख ३९ हजार ९० रुपयांचे नुकसान झाले आहे. कलसाडी येथे ३३ घरांचे अंशत: नुकसान होऊन एक लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भादे गावात १८ घरांच्या नुकसानीमुळे ६८ हजार ८०० रुपयांचे तर वैजाली येथे १३ घरांचे अंशत: नुकसान होऊन ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. परिवर्धे येथे २७ घरांचे अंशत: नुकसान होऊन ६५ हजार रुपयांचे तर करणखेडा गावात पाच पाच घरांच्या अंशत: नुकसानीमुळे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सोनवल या गावात आरिफ मुस्तफा बोहरी यांच्या घराजवळ असलेल्या चक्कीवर विद्युत रोहित्रचा फॉल पडल्यामुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे.शहादा तालुक्यातील कलसाडी व असलोद या महसूल मंडळातील गावांमध्ये अंशत: व पूर्णत: ५३२ घरांची पडझड होऊन ३० ते ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून शेतकºयांच्या ऊस, केळी व पपई या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून ६५ ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी महसूल, कृषी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांच्या सतत संपर्कात राहून ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पंचनामे युद्धपातळीवर सुरु असून त्यांचा अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत राज्य शासनाला पाठवून शेतकºयांना व नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वादळामुळे कलसाडी महसूल मंडळ अंतर्गत येणाºया अनेक गावांमध्ये वीज वितरण कंपनीचे विद्युत रोहित्रांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे घरगुती वीज व पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. या परिस्थितीत पाडळदा गटाचे जिल्हा परिषदेचे सदस्य धनराज पाटील यांनी अनेक गावात जाऊन जनरेटरच्या माध्यमातून ग्रामस्थांना व गुरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. पाटील यांनी महसूल व वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांशी वारंवार संपर्क करीत ग्रामस्थांना लागणाºया जीवनावश्यक व इतर अडचणींच्या समस्यांचे निराकरण केले. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाºयांनी युद्धपातळीवर काम करीत दीड दिवसात वीजपुरवठा सुरळीत केला.